
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
भारतीय तरुणांचे बाइकप्रेम सर्वश्रूत आहे. ‘एआय’च्या प्रवेशानंतर तर बाइकच्या श्रेणीत कमालीचा बदल झाला आहे. पण तरुणांना खरे वेड तर गाडी वेगात नेण्याचे असते आणि ती बाइक ट्विन एक्झॉस्टची असल्यास वेगाला आणखीच बूस्ट मिळतो. दुचाकी श्रेणीचा विचार केल्यास सध्या काही वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल आणि ठरावीक सीसीच्या दुचाकीत ट्विन एक्झॉस्टचा पर्याय दिला जात असून, तो भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरत आहे. प्रामुख्याने वाहन वेगात असेल तेव्हा त्यावर नियंत्रण राहण्यासाठी ट्विन एक्झॉस्ट किंवा ‘मफलर’ मोलाची भूमिका बजावते.