Two Roses on the Moon
sakal
आजवर लागलेले सर्व महत्त्वाचे शोध आधी कल्पनेत किंवा स्वप्नात वगैरे लागले. वेडीवाकडी स्वप्ने पडणे हे अपचनाचे लक्षण मानले जाते. ऑगुस्ट केकुले नामक जर्मन रसायनशास्त्रज्ञाने काहीतरी अभक्ष्य खाल्ले आणि तो झोपी गेला. झोपेत त्याला शेपट्या तोंडात धरुन बसलेले साप दिसले. त्यावरुन त्याला बेंझिनच्या सहा अणूंची संरचना सुचली. हा शोध सेंद्रिय रसायनशास्त्रात क्रांती घडवणारा ठरला म्हणे. असेलही. आम्हाला काय त्याचे? अपचनातूनही शोध लागतात, एवढा धडा सध्या आम्हाला पुरे आहे. केकुले असे आडनाव असते तर आम्ही हे असले शोध मुळात लावलेच नसते! पण ते जाऊ दे.