Uddhav Thackeray
esakal
सप्तरंग
Premium|Uddhav Thackeray: ‘महाराष्ट्राचा मोठा प्रश्न: मुंबईत उद्धवाचे ‘आवाज’ कुठे?’
Maharashtra politics: भारतातील राजकारण आणि भू-राजकारणातील बदल लक्षात घेतल्यास, कौटिल्याचे भू-राजकीय तत्त्वज्ञान आजही कालबाह्य झालेले नाही. राज्यघटना आणि प्रजासत्ताकाचा आत्मा जपणे महत्त्वाचे आहे.
संजीव साबडे saptrang@esakal.com
उद्धव ठाकरे यांनी शहरावरील लक्ष कायम ठेवून ग्रामीण प्रश्नांवर लढलं पाहिजे. कोकणात व अन्यत्रही अनेक अमराठी लोकांनी ग्रामीण भागात जमिनी व मालमत्ता घ्यायचा सपाटा चालवलाय, तेथील कामांचे ठेकेही अमराठी लोकच मिळवत आहेत. असे अनेक प्रश्न शहरात व गावागावांमध्ये आहेत. या मराठी माणसाला रोजगार, नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शिवसेनेने काही केल्याचं आठवत नाही, शेतीच्या प्रश्नांवरही लढे दिले नाहीत. हिंदुत्वाच्या नावाखाली धार्मिक वैमनस्य पसरवणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी रोजगारासाठी लढा हे उत्तर असू शकते.

