संपत्ती

त्या एका वर्तमानपत्रातल्या उपसंपादक पदावरून पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या.
Property

Property

sakal

Updated on

- श्‍याम मनोहर, saptrang@esakal.com

त्या एका वर्तमानपत्रातल्या उपसंपादक पदावरून पाच महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्या होत्या. कामावर असताना त्या मधून-मधून वर्तमानपत्रात रविवारच्या पुरवणीत लेख लिहायच्या. स्त्रियांच्या कपड्यांच्या फॅशन्स हा त्यांच्या आवडीचा विषय होता.

एक सिनिअर साहित्याचे टीकाकार त्यांच्या लेखनाची खूप स्तुती करायचे. त्या सेवानिवृत्त झाल्यावर टीकाकार त्यांना फोनवर म्हणाले होते, ‘‘सेवानिवृत्त म्हणजे लेखनातून निवृत्ती नाही. जागतिकीकरण आलेच, जग झपाट्याने बदलतेय. स्त्रियांच्या कपड्यांच्या फॅशन रोज बदलताहेत. स्त्रिया धीट होताहेत, नव्या फॅशन्स पटापट उचलताहेत. उदारीकरण आलेच. स्त्रिया फॉर्म सजवायला, दाखवायला उत्सुक आहेत. तुमचे नवे वाचायला मी आणि वाचक उत्सुक आहेत. बाय.’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com