New Marathi Book : जिज्ञासू वाचकाच्या पथदर्शी वाचननोंदी

Marathi Literature and Reading Culture : 'साद आणि दाद' हे पुस्तक डिजिटल काळातील वाचनसंस्कृतीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून, डॉ. अनुराग लव्हेकर यांनी इतिहास, विज्ञान आणि साहित्यातील वैविध्यपूर्ण पुस्तकांचा रसाळ आस्वाद घेत वाचकांना वैचारिक लवचिकतेचे आणि बौद्धिक लोकशाहीचे नवे भान दिले आहे.
Marathi Literature and Reading Culture

Marathi Literature and Reading Culture

esakal

Updated on

डॉ. आलोक जत्राटकर - saptrang@esakal.com

‘पुस्तकांविषयीचे पुस्तक’ या गटात मोडणारे ‘पुस्तके : साद आणि दाद’ हा पारंपरिक अर्थाने ‘समीक्षा-ग्रंथ’ नसून तो रसिक वाचकाने लिहिलेला संवादात्मक आस्वाद आहे. येथे समीक्षेपेक्षा वाचनानुभवाची प्रामाणिक नोंद अधिक ठळकपणे होते आहे. सोशल मीडियावरून उभ्या राहिलेल्या वाचन-संवादातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हे पुस्तक डिजिटल काळातील वाचनसंस्कृतीचे दस्तऐवज ठरते. इतिहास, संस्कृती, राजकारण, विज्ञान, वैद्यक, पर्यावरण, कादंबरी, कविता, विनोद, अनुवाद – असा मोठा पट पुस्तकात येतो. हीच या ग्रंथाची ताकद आहे.

या पुस्तकाच्या वाचनातून काही महत्त्वाची निरीक्षणे सामोरी आली. ती अशी की, ही तशी काही पारंपरिक समीक्षा नाही, तर वाचलेल्या पुस्तकांचे आस्वादात्मक, वाचककेंद्रित रसग्रहण आहे. वाचनासाठी आणि विशेषतः लिहिण्यासाठी ज्या पुस्तकांची निवड केली आहे, त्यांत ‘आवडी’बरोबरच ज्यांच्याशी वाचनाचे ‘भावनिक नाते’ जोडलेले आहे, त्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com