Usman Tariq bowling : आणखी एक ‘फेकू’ गोलंदाज

Usman Tariq Pakistan off-spinner controversial bowling style : पाकिस्तानचा नवोदित ऑफस्पिनर उस्मान तारिक वादग्रस्त शैलीमुळे चर्चेत आला आहे; विश्वकरंडक सामन्यात त्याची वेगवान आणि तिरकस हाताने गोलंदाजी भारतीय फलंदाजांसाठी आव्हान ठरणार आहे.
Usman Tariq Pakistan off-spinner controversial bowling style

Usman Tariq Pakistan off-spinner controversial bowling style

sakal

Updated on

शैलेश नागवेकर

पाकिस्तानचा नवोदित ऑफस्पिनर उस्मान तारिक हा ऑफस्पिनर वादग्रस्त शैलीमुळे चर्चेत आला आहे. पाकिस्तानकडे आतापर्यंत सईज अजमल, मोहम्मद हफिझ, शोएब मलिक, बिलाल आसिफ या ऑफस्पिनरवर अवैध शैलीमुळे गोलंदाजी करण्यास काहीकाळ बंदी घालण्यात आली होती. या पंक्‍तीत आता उस्मान तारिक आला आहे.

पाकिस्तानकडे वेगवान गोलंदाज तयार होण्याची परंपरा आहे. इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर असे दिग्गज वेगवान गोलंदाज पाकिस्तानमध्येच तयार झालेत; पण एकीकडे उत्तम वेगवान गोलंदाजांचे पीक येत असताना दुसरीकडे संशयास्पद शैली असलेले गोलंदाज पाकिस्तानमध्ये काही कमी नाहीत. आधुनिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओखळला जाणारा शोएब अख्तरची गोलंदाजी उघड्या डोळ्यांनी पाहता तो सरळसरळ चेंडू फेकत असल्याचे दिसून यायचे. याच पाकिस्तानचा नवोदित ऑफस्पिनर उस्मान तारिक नावाचा ऑफस्पिनर वादग्रस्त शैलीमुळे चर्चेत आला आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत आज होत असलेल्या भारत-पाक सामन्यात त्याच्यावर लक्ष असणार आहे. पाकिस्तानकडे आतापर्यंत सईज अजमल, मोहम्मद हफिझ, शोएब मलिक, बिलाल आसिफ या ऑफस्पिनरवर अवैध शैलीमुळे गोलंदाजी करण्यास काहीकाळ बंदी घालण्यात आली होती. अखेर त्यात सुधारणा करायला भाग पाडण्यात आले. या पंक्‍तीत आता उस्मान तारिक आला आहे. या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याअगोदर तो १ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत केवळ तीनच आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला आहे, आता थेट त्याला विश्वकरंडक स्पर्धेत उतरवण्यात आले आहे. अगोदरच्या तीन आणि विश्वकरंडक स्पर्धेतील एक लढत असे चार आंतरराष्ट्रीय सामने तो खेळलाय आणि लगेचच त्याच्या संयशास्पद शैलीबाबत बोलले जाऊ लागले आहे. बाहेरील प्रेक्षक तर सोडाच विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळला. त्यात एका सामन्यात उस्मान तारिकचा समावेश होता. त्याने ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा फलंदाज कॅमेरून ग्रीनला बाद केले. पॅव्हेलियनममध्ये परतत असताना ग्रीनने तो कशी बॉलिंग करतोय, हे हाताने दाखवले... तो सरळसरळ चेंडू फेकतोय हेच ग्रीनला दर्शवायचे होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com