valentine day
sakal
जीवशास्त्रीय कारणांमुळे तयार झालेल्या आकर्षणाचे धागे विरू लागले की आपोआपच ‘प्रेमा’चा बहर ओसरू लागतो. काही तरी ‘मिसिंग’ आहे, असं वाटू लागतं. विरत जाणाऱ्या धाग्यांना नव्यानं सांधावं लागतं...
‘व्हॅलेन्टाइन डे’ अर्थात ‘प्रेम दिवस’ होऊन आता चांगले आठ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे आता फुला-पानांच्या नक्षी असलेल्या गोडगुलाबी पोस्ट्स किंवा मेसेजेस आणि विरहव्याकूळ कवितांची रीळं यांचा पूर जरासा ओसरला असल्याने मी जरा इथे प्रेमाबद्दल चार गोष्टी खरडतोय...