Books
BooksSakal

पुस्तकांतून उलगडणारी एका देशाची निर्मिती

१९७१ च्या घटनेकडे भारताने पाकिस्तानवर मिळविलेला निर्विवाद विजय म्हणूनही पाहिले जाते. या घटनेचा अनेक लेखकांनी अनेक अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१९७१ च्या घटनेकडे भारताने (India) पाकिस्तानवर (Pakistan) मिळविलेला निर्विवाद विजय (Vijay Diwas 2021) म्हणूनही पाहिले जाते. या घटनेचा अनेक लेखकांनी अनेक अंगांनी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

इंडिया अँड द बांगलादेश लिबरेशन वॉर

लेखक : चंद्रशेखर दासगुप्ता

प्रकाशन : २०२१

१९७१ च्या युद्धावरील हे सर्वांत ताजे पुस्तक मानावे लागेल. या युद्धासंदर्भात घडलेल्या काही प्रसिद्ध ‘घटना’ या केवळ ‘कथा’ आहेत आणि वास्तव वेगळेच आहे, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

द क्रुएल बर्थ ऑफ बांगलादेश

लेखक : आर्चर ब्लड

प्रकाशन : २००२

आर्चर ब्लड यांचे हे पुस्तक अधिक वास्तववादी वाटते. ब्लड यांनी हे पुस्तक लिहिताना अमेरिकी सरकारने युद्धाबाबतच्या ठेवलेल्या नोंदी, अनेक पत्रे, गोपनीय संदेश यांचा आधार घेतला आहे.

बांगलादेश : अ लिगसी ऑफ ब्लड

लेखक : अँथनी मॅस्केरेन्हास

प्रकाशन : १९८६

पत्रकार अँथनी मॅस्केरेन्हास यांनी या पुस्तकात बांगलादेशच्या निर्मितीपासून या देशाची वाटचाल शब्दबद्ध केली आहे. मॅस्केरेन्हास यांनी शेख मुजिबूर रेहमान आणि झिया उर रेहमान यांच्या राजकारणावर भर दिला आहे.

द लाइटनिंग कॅम्पेन : द इंडो-पाकिस्तान वॉर

लेखक : मेजर जनरल डी. के. पलित

प्रकाशन : १९७२

मेजर जनरल डी. के. पलित यांनी भारतीय लष्कराच्या अतुलनीय शौर्याचे वर्णन करणारे पुस्तक लिहिले. लष्कराच्या कारवाईमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांची जाचातून कशी सुटका झाली, युद्धप्रसंगांची माहिती दिली आहे.

द ब्लड टेलिग्राम

लेखक : गॅरी जे. बास

प्रकाशन : २०१३

पाकिस्तानी सैन्याकडून पूर्व पाकिस्तानात होत असलेले अत्याचार रोखण्यात अमेरिका सरकारला कसे अपयश आले, हे त्यांच्याच अधिकाऱ्याने दाखवून दिले होते. आर्चर ब्लड यांच्या अहवालावर आधारित हे पुस्तक १९७१ च्या युद्धाचा एका नव्या अंगाने मागोवा घेते.

डेड रिकॉनिंग

लेखिका : शर्मिला बोस

प्रकाशन : २००१

पाकिस्तानमधील अंतर्गत संघर्षाचे भारत-पाकिस्तान युद्धात झालेले रूपांतर; या युद्धात भारताला रशियाचा तर, पाकिस्तानला अमेरिकेचा मिळालेला पाठिंबा आणि नवीन देशाची निर्मिती या घटना डोळ्यासमोर ठेवून शर्मिला बोस यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

१९७१ : अ ग्लोबल हिस्टरी ऑफ क्रिएशन ऑफ बांगलादेश

लेखक : श्रीनाथ राघवन

प्रकाशन : २०१३

लेखक राघवन यांनी त्यांच्या या पुस्तकात १९७१ च्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे.

सरन्डर ऑफ डाक्का

लेखक : जे. एफ. आर. जेकब

प्रकाशन : १९९७

मेजर जनरल जे. एफ. आर. जेकब यांनी त्यांना आलेले अनुभव, प्रसंगांची क्रमवारी आणि जवानांचे शौर्य याचे वर्णन वाचण्यासारखे आहे. सैन्याकडून अत्याचार होत असताना भारतीय लष्कराने कशा प्रकारे तयारी केली, याची माहिती पुस्तकातून मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com