Marathi Book : शब्दांतून उलगडणारी चंद्रकळेची भर्जरी गाथा...

Vastragatha book Vinay Narkar Indian textile culture : विनय नारकर यांचे ग्रंथ ‘वस्त्रगाथा’ वस्त्रकलेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंवर सखोल नजर टाकतो. मराठी साहित्यप्रेमींना ही गाथा अभिजात भाषा, पारंपरिक वस्त्रज्ञान आणि दख्खनी संस्कृतीची अनमोल भेट ठरेल.
Vastragatha book Vinay Narkar Indian textile culture

Vastragatha book Vinay Narkar Indian textile culture

esakal

Updated on

प्रवीण टोकेकर

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांचं कलेत रूपांतर करणाऱ्या मानवाच्या उत्क्रांतीला दाद द्यायला हवी. यातील प्रत्येक गरजेचा कलाविष्कार माणसाच्या प्रतिभेची साक्ष पटवतो. यात पाककौशल्याने आगळी चूल मांडली आहे, तर वास्तुरचनेने नवा कळस गाठला आहे. वस्त्रांची तर दुनियाच झगमगते आहे. वल्कले आणि प्राणिमात्रांची कातडी गुंडाळून थंडीवाऱ्यापासून स्वत:चं संरक्षण करणारा माणूस ‘स्मार्ट फॅब्रिक’पर्यंत येऊन ठेपला. त्रिमित छपाईचे वेगवेगळे उन्मेष दाखवू लागला. कुठल्याही अभ्यासकाला हा प्रवास स्तिमित करणारा आहे असं वाटल्याशिवाय राहणार नाही.

वस्त्रप्रावरणांचा हा पट इतका व्यापक आहे की, त्याचा थांग लागू नये. अशा अफाट वस्त्रविश्वात पश्चिम घाटावरल्या संस्कृतीचा एक ठिपका. पश्चिम दख्खनच्या पठारावर प्राचीन काळापासून वस्त्रांची भाषा, ठेवण, रंग आणि पोत कशी बदलत, उत्क्रांत होत गेली, याचा थक्क करणारा लेखाजोखा सांगणारा ग्रंथ म्हणून विनय नारकर यांच्या ‘वस्त्रगाथा’कडे बोट दाखवावं लागेल. मराठी साहित्यप्रेमींना ‘वस्त्रगाथा’ ही गर्भरेशमी भेटच ठरावी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com