- शेषराव मोरे, saptrang@esakal.com
लोकसभेत आठवड्यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील बुद्धिवादी विचारविश्वाला भूकंपासारखा धक्का बसावा, असा एक भयंकर गौप्यस्फोट केला. ते गरजले : ‘‘सावरकरांची भारतीय राज्यघटनेविषयी काय धारणा होती, हे सांगून मी भाषणाची सुरुवात करतो. या घटनेत काहीही भारतीय नाही आणि तेच सर्वांत वाईट आहे, असे विधान सावरकरांनी केले होते. राज्यघटनेत भारतीय मूल्ये नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.