Vinod Sharma Painter : कलाकाराचे स्वातंत्र्य आणि सर्जनाची प्रक्रिया

Modern Indian Landscape Art : बडोद्याच्या संस्कारातून घडलेला एक कलंदर चित्रकार; नोकरी नाकारून सर्जनाचे स्वातंत्र्य जपणारे आणि आर्ट कॅम्पच्या माध्यमातून जागतिक कलावंतांना एकत्र आणणारे विनोद शर्मा यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आणि त्यांची अनोखी चित्रशैली.
Modern Indian Landscape Art

Modern Indian Landscape Art

esakal

Updated on

हर्ष भटकळ

नवनवीन शिकण्याचा ध्यास आणि आर्ट कॅम्प आयोजित करणे हा विनोद शर्मा यांचा ध्यास आहे. कलेच्या प्रांतातले उच्च शिक्षण बडोद्यामध्ये घेतलेल्या शर्मा यांनी नेहमीच वेगळ्या वाटा निवडल्या. जगन्नाथपुरीपासून ते ऑस्ट्रेलियासारख्या बाहेरच्या देशातही त्यांनी आर्ट कॅम्प भरवले. तिथे अनेक कलात्मक संकल्पना जन्माला आल्या. त्यांनी कधीच कुठे नोकरी केलली नाही. आपले स्वातंत्र्य जपले आणि सर्जनाचा प्रवासही कायम राखला.

मी चित्रकार व्हावं अशी अपेक्षा नव्हतीच मुळी...’, विनोद शर्मा असं अगदी सहजपणे सांगतात, पण त्यामागील उपरोधिक गंमत लक्षात येते. हा मुलगा चित्रकारांच्या घरात जन्माला आला होता. त्यांचे पिताजी हे चित्रकार आणि आई ह्याच विषयाची अध्यापक आणि तरीसुद्धा ‘घरात सर्वांना मी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावं अशी इच्छा होती.’ त्यांच्या आईने अखेरीस तो महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘तुला काय करायचं आहे?’ तेव्हा मी म्हणालो, ‘मला आर्ट कॉलेजमध्ये जायचं आहे.’ या स्पष्ट बोलण्यामुळे त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com