

Indian painter V Ramesh journey
esakal
चित्रकला बहुतेक वेळा दूरस्थ वाटते. गॅलरींच्या भिंतीत बंदिस्त झालेली, फक्त निवडक वर्तुळांमध्ये चर्चा होणारी किंवा चित्रांच्या लिलावातील भरमसाट आकड्यांमुळे लक्षात येणारी. परंतु काही चित्रकारांसाठी मात्र ही कला माणसांशी जोडलेली आहे. असे आजच्या कलाक्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहे- विशाखापट्टणम येथे स्थायिक झालेले व्ही. रमेश.
भावना, स्मरण आणि प्रत्यक्ष आलेले अनुभव यांची एक भाषा असते. ती वैयक्तिक असूनही जागतिक होते आणि त्यामुळे गोष्टींना दृश्य अवतार प्राप्त होतो. अनेक वर्षांच्या कारकिर्दीत व्ही. रमेश हे केवळ एक रंगचित्रकार किंवा प्रबोधनकार म्हणून गाजलेले नाहीत; ते प्रामुख्याने दृश्य माध्यमातून गोष्टी सांगणारे चित्रकार आहेत. त्यांची रंगचित्रे भावनांनी ओथंबलेली असतात आणि त्यांना अनेक स्तरांवर अर्थ प्राप्त होतो. त्यांचा दृष्टिकोन सूक्ष्म निरीक्षण, आत्मपरीक्षण आणि तरीही परंपरा आणि प्रयोगशीलता यांच्याबद्दल असणाऱ्या अतीव आदरातून घडलेला आहे. आमच्या संभाषणात त्यांनी त्यांच्यावरील सुरुवातीचे प्रभाव, घडवणारे गुरू आणि कलाप्रवास ज्या योगायोगांतून झाला हे सांगितले. कलेच्या केंद्रस्थानी असलेल्या तत्त्वज्ञानाबद्दलही ते मोकळेपणाने बोलले.