कथा राजा पुरंजनाची...

भागवत पुराणासंबंधीच्या माझ्या मागील स्तंभात मी भागवत पुराणातील एक अद्‍भुत अशी रूपक कथा सांगायला सुरुवात केली होती.
King Puranjana
King PuranjanaSakal
Summary

भागवत पुराणासंबंधीच्या माझ्या मागील स्तंभात मी भागवत पुराणातील एक अद्‍भुत अशी रूपक कथा सांगायला सुरुवात केली होती.

- विवेक देबरॉय, saptrang@esakal.com

भागवत पुराणासंबंधीच्या माझ्या मागील स्तंभात मी भागवत पुराणातील एक अद्‍भुत अशी रूपक कथा सांगायला सुरुवात केली होती. मी तुम्हाला यापूर्वीच असेही सांगितले आहे की भागवत पुराणात बारा स्कंध आहेत. भागवत पुराण खूप वाचले जाते मात्र, याची कुठलीही चिकित्सक आवृत्ती नाही. याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या प्रमाणित आहेत. तुमच्याकडे भागवत पुराणाची कुटलीही आवृत्ती असली तरी राजा पुरंजन याची कथा चौथ्या स्कंधामध्ये २५ व्या अध्यायात असण्याची शक्यता आहे.

पुरंजना नावाचा एक प्रसिद्ध राजा होता, जो पांचाळावर राज्य करत होता. तो नऊ दरवाजे असलेल्या सुंदर नगरात आला. तिथं त्याला एक सुंदर स्त्री भेटली. तिला दहा नोकर होते आणि यातली प्रत्येक जण शंभर बायकांचा पती होता. ही सुंदर स्त्री म्हणजे पुरंजनी. तिच्याभोवती नागाचा पहारा होता. पुरंजना आणि ही सुंदर स्त्री पुरंजनी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तिने त्याला वचन दिलं की ती त्याला शंभर वर्षे आनंदी ठेवेल. तुम्हाला आठवत असेल मागील भागात मी सांगितलं होतं की पुरंजनाचा एक अविज्ञात नावाचा एक मित्रही होता, ज्याच्यापासून तो प्रवासात विभक्त झाला.

रूपकामध्ये, काही गोष्टी स्पष्ट आहेत. तर काही सूचक आणि पुसट हेत. पुरा म्हणजे शहर आणि पुरंजना म्हणजे शहरात राहणारी व्यक्ती. भगवद्‍गीतेसह अनेक ग्रंथांमध्ये शरीराची तुलना नऊ दरवाजे (दोन डोळे, दोन नाकपुड्या, दोन कान, तोंड, जननेंद्रिय आणि गुदद्वार) असलेल्या शहराशी केली आहे. अशा प्रकारे, आपल्यापैकी प्रत्येकजण पुरंजनासारखा आहे. भागवत पुराणात आपल्याला या प्रत्येक दरवाजाची नावे दिली आहेत, त्या रूपकांचा भाग म्हणून. स्तंभासाठी ते खूप तपशीलवार आहे. पण एक उदाहरण द्यायला हवे.

पुरंजना या शहरात नगरात राहू लागला, पुरंजनी पत्नी म्हणून त्याच्यासोबत राहत होती. एक दिवस त्याने ग्रामकाच्या प्रदेशात जाण्यासाठी असुरी नावाचा दरवाजा वापरला. असुरी हे नाव असुरांच्या नावावार जाते. ग्रामका म्हणजे जिथे कोणी ग्राम्य (लैंगिक आणि कामुक) व्यवसायात गुंतलेला असतो. आता तिथल्या स्त्री चा विचार करूया ती बुद्धिमत्ता (बुद्धी) आहे आणि तिचे दहा सेवक म्हणजे दहा ज्ञानेंद्रिये, पाच इंद्रिये आणि पाच क्रिया इंद्रिये. प्रत्येक इंद्रियांमध्ये अनेक प्रवृत्ती असतात. प्राण, अपान, व्यान, सामना आणि उदना ही सर्पाची पाच कुंडले आहेत, जी जीवनाच्या श्वासाची पाच अंगे आहेत. मानवाने शंभर वर्षे जगण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. शेवटी, त्याचा मित्र अविज्ञात हा कोण? जो शोधू शकत नाही किंवा सापडत नाही. हे सगळे लक्षात घेतल्यावर तुमच्या लक्षात आले असेल की, अविज्ञात हा आत्मा आहे.

शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर पुरंजन आपल्या सैन्यासह शिकारीला निघाला. तो त्याच्या रथावर चालत होता, पाच घोड्यांना हा रथ जोडलेला होता. दोन दांडे, दोन चाके, एक धुरा, तीन बांबूचे खांब, जोखड व खांब यांच्यामध्ये पाच सांधे, एक लगाम, एक सारथी, एक आसन, जूसाठी दोन खांब, पाच प्रकारची शस्त्रे आणि पाच प्रकारची शस्त्रे होती. त्याचे चिलखत आणि अंगावरची कवचस्वरुपाची आवरणं अतुलनीय सोन्यापासून बनलेले होते. त्याच्याबरोबर अकरा सेनापती होते. हे पुन्हा गुंतागुंतीचे रूपक आहे.

रथ हे त्याचे शरीर आहे, पाच घोडे पाच इंद्रिये आहेत, दोन दांडे म्हणजे ‘मी’ आणि ‘माझं’ या संकल्पना आहेत, दोन चाके ही चांगली आणि वाईट कृत्ये आहेत, धुरा हा जन्मजात स्वभाव आहे, बांबूचे तीन खांब हे तीन गुण आहेत. पाच सांधे म्हणजे जीवनाच्या श्वासाचे पाच पैलू, लगाम म्हणजे मन, सारथी म्हणजे बुद्धी, आसन हे हृदय, जूचे दोन ध्रुव म्हणजे दुःख आणि भ्रम, पाच प्रकारची शस्त्रे म्हणजे इंद्रियांच्या पाच वस्तू, सात आयुध म्हणजे शरीराची सात आवरणे, पाच प्रकारची अस्त्र म्हणजे पाच कृतीची इंद्रिये, धनुष्य, आसक्ती, अक्षुण्ण तरप म्हणजे अनंत इच्छा आणि अकरा सेनापती दहा इंद्रिये आणि मन. ही रुपककथा म्हणजे मानवी भाव - भावना आणि त्याच्या भोवतीचं वातावरणाचं प्रतिनिधीत्व करतात.

दरम्यान, पुरंजनीद्वारे पुरंजनाला पुत्र आणि नातू झाले. चांदवेग नावाचा गंधर्वांचा राजा होता. त्याच्याकडे तीनशे साठ गंधर्वांचे सैन्य होते. त्यांच्यासोबत तेवढ्याच संख्येने गंधर्व महिला होत्या.

(गंधर्व दिवसा सज्ज राहतात. गंधर्व स्त्रिया रात्री सज्ज राहतात) थोडक्यात शल्क आणि कृष्ण पक्षाचे हे गट प्रतिनिधीत्व करतात) या गंधर्वबरोबर पुरंजनाचे युद्ध झाले त्यांनी शहर जिंकले आणि लुटले. त्याला कुणीच मदत करू शकले नाही. पुरंजना यांचा पूर्ण पराभव झाला. आपल्या नातेवाईकांशी आणि ममत्व भावनेने जोडलेल्या अनेकांचे रक्षण न करता आल्याने त्याला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. अखेर तो या शहरातून पळून गेला आणि या युद्धात त्या शहराचा संपूर्ण नाश झाला.

मात्र निधनसमयी तो पुरंजनीचा विचार करत होता. तो तिचाच विचार करत राहिल्याने त्याचा पुनर्जन्म विदर्भाच्या राजाची मुलगी म्हणून म्हणून झाला. ही राजकन्या अत्यंत सुंदर अशी स्त्री होती. या राजकन्येचा विवाह राजा मलयध्वजाशी झाला होता. त्यांना मुलगे आणि मुली होत्या. आपलं राज्य पुत्रांच्या हाती देऊन, मलयध्वज तप करण्यासाठी वनात निघून गेला. कठीण स्वरुपाच्या अशा तपाचरणामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला आणि तो ब्रम्हत्वाशी एकरूप झाला.

विदर्भाच्या राजकन्याही आपल्या पतीच्या मागे जंगलात गेली होती, जेणेकरून ती त्याच्याकडे लक्ष देऊ शकेल. मात्र त्याचे निधन झाल्याने तिला सोक आवरेना. ती आपल्या मृत पतीच्या पाया पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडाचा वापर केला आणि तिच्या पतीचा मृतदेह या चितेवर ठेवला. तिचा विलाप सुरू होता. पतीच्या मागे सती जाण्याचा तिचा विचार पक्का झालेला होता. त्यावेळी एक ब्राह्मण तेथे आला आणि त्याने या राजकन्येला हे कृत्य करू नये असे सुचविले. या ब्राह्मणाने राजकन्येचे सांत्वन केले. ‘‘ तू कोण आहेस ? इथे पडलेल्याचा तू का शोक करत आहेस. तो कोण आहे?" हा ब्राह्मण कोण? आणि पुढं नेमके काय झाले ते पुढच्या स्तंभात मी सांगेनच.

(लेखक पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य असून त्यांचा पुराण आणि वेद तसेच भारतीय संस्कृती यांचा अभ्यास आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com