चॉईस इज युवर्स...

चॉईस इज युवर्स...

स्पर्धा परीक्षा करत असताना अभ्यासक्रमावर जरी भर द्यायचा असला तरी आंतरिक शक्तीकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. आंतरिक शक्ती ही एक विशिष्ट शक्ती आहे. दबलेली स्प्रिंग जशी सोडल्यावर उसळी मारते, अगदी तसेच आंतरिक शक्तीच्या बाबतीत आहे. हिचा वापर कसा करायचा, हे आपण जरूर शिकले पाहिजे. थोड्या-थोडक्‍या गुणांमध्ये जे विद्यार्थी अपयशी ठरतात, चार-पाच वर्षे प्रयत्न करूनसुद्धा यश येत नाही, त्यांनी तरी हे जाणूनच घेतले पाहिजे. निसर्गाने आपल्याला दोन मने दिली आहेत. एक अंतर्मन व एक बाह्यमन; पण मन म्हणजे काय? मन हे एक विद्युत शक्तीसारखी असते. त्याला पाहता येते. त्याचा उपयोग करता येतो; पण स्पर्श करू शकत नाही. 

मनशक्ती अभ्यासक दीपक चोप्रा म्हणतात की, मन हे शरीरभर पसरलेले आहे. हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक विल्यम जेम्स म्हणतात की, जगातल्या यशस्वी व्यक्तींनी केवळ १० टक्के त्यांच्या मनशक्तीचा वापर केला होता. यावरूनच कल्पना येते आपण किती त्याचा वापर करतो. 

अंतर्मनाकडे ९० टक्के शक्ती असून ते सेवक आहे, तर बाह्यमनाकडे १० टक्के शक्ती असून ते मालक आहे. हे कसे काय ? ज्याप्रमाणे समुद्रामधील जहाजाने यशस्वी प्रवास करायचा असेल, तर दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे उत्तम कॅप्टन आणि दुसरे इंजिन ड्रायव्हर. कॅप्टन वरून इंजिन ड्रायव्हरला ज्याप्रमाणे सूचना देईल त्याच सूचना ड्रायव्हरने अमलात आणायच्या असतात. असे का? तसे का? असे प्रश्‍न विचारायचे नसतात. ड्रायव्हरने तसे जर केले तर टायटॅनिकसारखी घटना घडते.

अगदी याचप्रकारे आपले बाह्यमन हे कॅप्टन आहे, अंतर्मन इंजिन ड्रायव्हर. बाह्यमन ज्या सूचना देईल, त्याच सूचना अंतर्मन खरे मानून कामाला लागते. आपल्या आयुष्यात तशा घटना आणते. जर आपण म्हणत राहिलो, स्पर्धा परीक्षा अवघड आहे, माझ्याने काय होणार नाही, किती प्रयत्न करायचा वगैरे..वगैरे... तर अंतर्मन तशी सत्य परिस्थिती आणते. याउलट मी स्पर्धा परीक्षा यशस्वी होणारच, स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायला मी पात्र आहे, मी नेहमी उत्तम अभ्यास करतो, माझी स्मरणशक्ती नेहमी मला साथ देते, अशाप्रकारे जर वाक्‍य तयार करून आपण म्हणायला लागलो किंवा या हेतूने विचार करायला लागलो तर तशी सत्य परिस्थिती यायला लागते. सो चॉईस इज युवर्स.

मनाची वैशिष्ट्ये
 बाह्यमन हे १२ तास जागे असते. अंतर्मन हे २४ तास जागे असते.
 बाह्यमनाकडे मानवी शक्ती आहे. अंतर्मनाकडे दैवी शक्ती आहे.
 बाह्यमनाकडे १० टक्के शक्ती आहे. अंतर्मनाकडे ९० टक्के शक्ती आहे.
 बाह्यमन मालक आहे. अंतर्मन सेवक आहे.
 बाह्यमन विचार करू शकते. अंतर्मन विचार करत नाही.
 बाह्यमन उद्दिष्ट ठरवते. अंतर्मन हे उद्दिष्ट साध्य करते.

kotekar.vivek37@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com