निवृत्तांसाठी स्वस्त आरोग्यसेवा (विवेक वेलणकर)

vivek velankar
vivek velankar

वाढीव सवलतमर्यादा 1.50 लाखावरून 2 लाख
सध्याच्या आधुनिक युगात माणसाचं आयुष्यमान वाढत चाललं असलं तरी या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या समस्याही वाढत चालल्या आहेत. रक्‍तदाब, मधुमेह यांसारखे रोग तर जवळपास प्रत्येक कुटुंबाचा जणू भागच बनल्यासारखे आहेत. आधुनिक काळात निवृत्तिवेतन ही संकल्पना वेगानं कालबाह्य होत आहे. खासगी कंपन्यांमधूनच नव्हे तर सरकारी संस्थांमधूनसुद्धा निवृत्तिवेतनाची संकल्पना हळूहळू "निवृत्त' होत चालली आहे. शारीरिक तक्रारीही नेमक्‍या निवृत्तीनंतरच्या काळातच जोर धरू लागतात. गुडघे बोलू लागतात, हृदयविकारापासून कर्करोगापर्यंतचे रोग आक्रमण करू लागतात आणि या विविध आजारांशी लढण्यासाठी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली रक्‍कमही तुटपुंजी वाटू लागते. महागड्या वैद्यकीय सेवांचा खर्च कुठून करायचा या काळजीनं अस्वस्थ व्हायला होतं. अचानक आजारपण आल्यास वैद्यकीय चाचण्या आणि उपचारांना सामोरं जावं लागतं. मौज-मजेच्या, चैनीच्या बाबतीत आपण तडजोड करू शकतो; परंतु आजारपणाच्या वेळी अशी कोणतीही तडजोड करता येत नाही. साहजिकच अशा संकटाच्या वेळी शक्‍य ते सर्व उपाय करून जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावं लागतं. "कशाचंही सोंग आणता येतं; मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही,' या उक्‍तीप्रमाणे एकीकडं रुग्णाची काळजी, तर दुसरीकडं पैसा उभा करण्याची चिंता या दुहेरी कात्रीत नातेवाईक सापडतात. याला एक उपाय म्हणजे वैद्यकीय विमा योजना. मात्र, आज बाजारात असलेल्या बहुसंख्य विमा योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना नव्यानं समाविष्ट होऊ देत नाहीत. काही योजनांमध्ये समाविष्ट करून घेतलंच तर विम्याचा दर प्रचंड असतो आणि त्यापेक्षाही सध्याचे आजार विम्यातून वगळण्यात येतात. ज्यांचा पूर्वीपासून वैद्यकीय विमा आहे, त्यांनाही केवळ ते ज्येष्ठ नागरिक झाले म्हणून विम्याचा प्रीमिअम पूर्वीच्या दुप्पट भरायची वेळ येते आहे आणि या सगळ्यामुळं ज्येष्ठ नागरिकांमध्ये हतबलतेची आणि वैषम्याची भावना आहे. कोणताही वैद्यकीय विमा बाह्य रुग्ण विभागातले उपचार, वैद्यकीय चाचण्या यांना समाविष्ट करत नसल्यानं वैद्यकीय विमा असलेल्यांनाही या गोष्टींवर भरमसाट खर्च करावा लागतो आहे. समाजाची गरज ओळखून समाजासाठी काम करण्याचं व्रत घेतलेल्या "सकाळ'नं गेल्या 11 वर्षांपासून सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्यानं ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात सर्व प्रकारचे उपचार मिळण्यासाठी एक अभिनव योजना राबवली आहे. या योजनेचं नाव आहे "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच.'

समाजातले प्रश्‍न, समस्या यांना वाचा फोडून आपली जबाबदारी संपली, असं न मानता या समस्यांवर उपाय शोधून स्वत: पुढाकार घेऊन ते राबवणं हे "सकाळ माध्यमसमूहा'चं वैशिष्ट्य. "बस डे', "तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान', "जलयुक्‍त शिवार अभियान' अशा कितीतरी उपक्रमांमधून हे दिसून आलं आहे. "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' गेली 11 वर्षं अविरतपणे सुरू असलेला आणि ज्येष्ठांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही उत्तम आरोग्यसुविधा देणाऱ्या व्यासपीठाचाच आविष्कार आहे. पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवड या भागांतले दहा हजारांहून अधिक नागरिक या योजनेचे सभासद आहेत आणि वर्षानुवर्षं सभासदत्वाचं नूतनीकरण करत आहेत. या सभासदांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांचं मानसिक आरोग्यही उत्तम राहावं यासाठी या उपक्रमांतर्गत सभासदांना आठ सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही दिली जाते.

आता या योजनेची वैशिष्ट्यं समजून घेऊ या. साधारणपणे कुठल्याच वैद्यकीय विमा योजनेत नसलेल्या गोष्टी यामध्ये आहेत. पहिलं म्हणजे, योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागत नाहीत आणि सध्या असलेल्या आजारांना कव्हरेज मिळणार नाही, असंही सांगितलं जात नाही. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, कोणताही वैद्यकीय विमा उतरवल्यावर वर्षभरात आपल्या प्रकृतीला काहीही झालं नाही, याचा तर आनंद होतोच; पण त्याच्या जोडीला विम्याच्या हप्त्याचे पैसे वाया गेले, अशी रुखरुखही लागून राहते. या योजनेत मात्र प्रीमिअमपोटी भरलेल्या रकमेएवढ्या किमतीच्या तपासण्या (त्यात ईसीजी, नेत्रतपासणी, ऑडिओमेट्री, गुडघ्यांचा एक्‍सरे) मोफत केल्या जातात. म्हणजे वर्षभर आपली प्रकृती ठणठणीत राहिली तरी प्रिव्हेन्टिव्ह मेडिकल चेकअप्‌ मोफत होत असल्यानं पैसे वाया गेल्याची भावनाही निर्माण होत नाही. अन्य वैद्यकीय विम्यांमध्ये बाह्य रुग्ण विभाग, पॅथॉलॉजिकल टेस्ट, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्‍सरे आदी गोष्टी समाविष्ट होत नाहीत. त्यामुळं त्या करण्यासाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात. या योजनेत मात्र पॅथॉलॉजी चाचण्या, सीटी स्कॅन, एमआरआय एक्‍सरे या सर्वांवर 40 टक्‍के सवलत, तर बाह्य रुग्ण विभागांतल्या उपचारांवर 20 टक्‍के आणि औषधांवर 15 टक्‍के सवलत मिळते. तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला 200 रुपयांमध्ये मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं तर बिलावर 75 टक्‍के सवलत मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तरीही या योजनेचा वार्षिक प्रीमिअम अन्य कोणत्याही वैद्यकीय विमा योजनेच्या प्रीमिअमपेक्षा कमी आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या या वैद्यकीय सुरक्षा कवचासाठी 50 ते 69 दरम्यान वय असणाऱ्या या नागरिकांना 4300 रुपये, तर 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना 5400 रुपये वार्षिक खर्च आहे. दर्जेदार वैद्यकीय सेवा, उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल डॉक्‍टर्स ही या योजनेची वैशिष्ट्यं ठरली आहेत. या योजनेनं ज्येष्ठांचा विश्‍वास मिळवला आहे. "सकाळ'च्या सर्वच उपक्रमांना नागरिकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसाच तो याही उपक्रमाला मिळत आहे आणि मिळेल असा विश्वास वाटतो.

सभासदांच्या प्रतिक्रिया
1) मी गेली 11 वर्षं आपला नियमित सभासद असून दरवर्षी या योजनेत न चुकता सहभागी होतो. परमेश्वरकृपेनं मला सेवा घ्यावी लागली नाही; तरीपण मी दरवर्षी सभासद होतो. ही योजना अत्यंत उपयुक्‍त असून वेळोवेळी मी सर्व तपासण्यांचा लाभ घेतला. आजच्या महागाईच्या काळात "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे, याचा मला अभिमान वाटतो व ही सेवा अशीच सुरू राहावी ही विनंती.
- माधव वामन दातार

2) मी व माझे यजमान रामचंद्र मोरेश्‍वर परचुरे, वय 85, आम्ही दोघं आपल्या "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' या योजनेचे 2007 पासून लाभार्थी आहोत. माझ्या यजमानांना सह्याद्री हॉस्पिटल, डेक्‍कन जिमखाना इथं पेसमेकर बसवला. त्याचा खर्च न झेपण्यासारखा होता; परंतु आमच्याकडं "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' कार्ड असल्यामुळं खूप मोठी सवलत मिळाली. आम्ही दोघं दरवर्षी आवश्‍यक ते चेकअप्‌ करून घेतो. त्यातही आम्हाला सवलत मिळते. त्यामुळं आम्ही "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' या योजनेच्या प्रेमात पडलो आहोत, तसंच माझी दोन्ही मुलं या योजनेची लाभार्थी आहेत. अशी ही सह्याद्री हॉस्पिटलमधली "सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' ही योजना लोकांच्या सेवेत निरंतर राहो व तिची कायम भरभराट होवो, हीच सदिच्छा. - रजनी रामचंद्र परचुरे (लाभार्थी क्रमांक ः 10/3451) आणि रामचंद्र मोरेश्‍वर परचुरे (लाभार्थी क्रमांक ः 10/3450)

अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी ः
तुम्ही आजही सभासदनोंदणी करू शकता. सभासद होणाऱ्यांसाठी वयाचा व निवासाचा दाखला आवश्‍यक. सर्व केंद्रांसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : 7798330123/7798320123 (वेळ ः सकाळी 9.30 ते सायंकाळी 7). फॉर्म "सप्तरंग' पुरवणीत उपलब्ध. तसंच ऍप-नोंदणीकरिता ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर S3K टाइप करा. ऍप डाउनलोड करूनही सदस्यत्वनोंदणी शक्‍य. पासवर्ड 6 ते 7 डिजिटचा असावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com