Premium|Organic Chia: वाशिमची ‘चिया क्रांती’ ; शेतकऱ्यांचा डिजिटल बाजारपेठेपर्यंतचा प्रवास, सेंद्रिय बियांपासून कोट्यवधींच्या उलाढालीपर्यंत

Chia Seeds Digital Market: कमी पाणी, कमी खर्च व उच्च नफा असलेल्या चिया पिकाने वाशिमच्या पीक पद्धती, बाजारपेठ आणि मूल्यवर्धनाचा चेहरामोहरा बदलला
Chia seed farming

Chia seed farming

Esakal

Updated on

व्ही. राधा, माधव गोखले - saptrang@esakal.com

स्थानिक व्यापार सुरू झाल्यावर स्पर्धा वाढली आणि दरांमध्ये लक्षणीयरीत्या सुधारणा झाली. असेंद्रिय (नॉन-ऑरगॅनिक) चियाचे दर प्रतिक्विंटल सुमारे २४ हजारांपर्यंत पोहोचले. सन २०२४-२५ या एका वर्षातच वाशिम बाजार समितीमध्ये चियाची जवळपास ४२ कोटींची उलाढाल नोंदवली गेली. आता शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरीही आपला माल विकण्यासाठी वाशिमला येतात.

अवघ्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वीची ही कहाणी. पूर्व विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यातले काही थोडेफार शेतकरी सोडले तर चिया सीड्स फार कोणाच्या ऐकिवात नव्हत्या. आज मात्र चित्र वेगळे आहे. खरिपात कापूस, डाळी, हळद, सोयाबीन आणि रब्बीच्या हंगामात गहू, हरभरा या पारंपरिक पिकांसाठी ओळखला जाणारा वाशिम जिल्हा आज देशातले सेंद्रिय चिया सीड्सचे कोठार म्हणून ओळखला जातो. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा डिजिटल बाजारपेठेपर्यंतचा चिया प्रवास सुरू झाला, तो २०२३च्या रब्बीच्या हंगामात, रिसोड तालुक्यातून. त्या वर्षीपर्यंत चिया पिकाखाली केवळ १६२ हेक्टर जमीन होती. आज हा आकडा दहा हजार हेक्टरच्या दिशेने जातो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com