esakal | साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै २०२१ ते १७ जुलै २०२१)
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope

साप्ताहिक राशिभविष्य (११ जुलै २०२१ ते १७ जुलै २०२१)

sakal_logo
By
श्रीराम भट saptrang@esakal.com

आमचा पासवर्ड ओम राम कृष्ण हरी !

पंचमहाभूतांना, तसेच आपल्या ग्रहमालेला सामावून घेणारे आकाश अर्थातच माणसाचा ह्रदयातही ह्रद्‌गत होऊन राहते ! असे हे माणसाच्या ह्रदयाकाशातील ह्रदगत प्रत्येक माणसाचा आतला आवाज होऊन राहात असतं. मनःस्पंदन, प्राणस्पंदन आणि ह्रदयस्पंदन एकच श्‍वास पकडत विश्‍वासानं जगत असतं. अर्थात विश्‍वास हा श्‍वासाला धरूनच ह्रदगताच्या रुपात नांदत असतो. माणसाच्या ह्रदगताला एक प्रकारच्या श्रद्धेचा किंवा विश्‍वासाचा ओलावा असतो. आणि हा ओलावाच माणसाच्या जीवनाला जीव लावतो ! जीव लावणारे तेच जीवन होऊ होऊ शकते ! माणसाचे ह्रदय द्रवतं, माणसाचं ह्रदयं कालवतं, माणसाचं ह्रदय दुखावतं, वर्मी बसणारा घाव हा ह्रदयाचाच असतो! आणि हेच माणसाचे ह्रदय भक्तीच्या स्पर्शानं ईश्‍वराचं मनोगत जाणून घेऊन परमाशांतीचा अनुभव घेतं !

अनंत आकाशाला पोटात घालून असलेलं भगवंतांचे ह्रदय सुह्रदय होऊन प्रत्येकाच्या ह्रदयात वास करून असतं! या सुह्रदाशी सतत जवळीक साधून राहणे, हीच मनुष्याची जीवनसाधना होऊ शकते !

ज्योतिष हे ईश्‍वराचे मनोगत ओळखू शकते. अर्थातच ज्योतिष हे एक श्रद्धा आहे. त्यामुळेच ही श्रद्धा ईश्‍वरभक्ती जाणू शकते. पत्रिकेतील बारा भावांना जाणणारे ज्योतिष हे ह्रदयचं आहे. ह्रदयाशी संबंधित चंद्र जगन्माउलीची नाळ पकडत चंद्रमौळी होत परमशांतीचा झरा झाला. माणसामध्ये इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती एकत्र नांदत असतात. इच्छा ही ज्यावेळी भक्‍तीचा विषय होते, त्यावेळी ती भक्तीचे साधन होऊन क्रिया होते आणि मग या क्रियेचा कर्मप्रवाह ज्ञानगंगेला मिळतो, आणि मग ही गंगा सुद्धा शिवशंकरांची शिरसावंद्य होते !

मित्रहो, सध्या गुरू कुंभ राशीत आहे. या सप्ताहात गुरुंशी मिथुन राशीतील बुधाचा लाभयोग होईल. रवीचा सुद्धा मिथुन राशीतून नेपच्यूनशी योग होईल. एवंच मिथुन, तुला, आणि कुंभ या वायुतत्त्वाच्या राशी संवेदनाशील होतील. त्यामुळेच श्रद्धावंतांना वायुरुपाने आषाढी वारीत सहभागी होत पवनपुत्र हनुमंतांप्रमाणे अष्टमीच्या प्रभावाक्षेत्रात ह्रदयाकाशातच पंढरीनाथांचे दर्शन होईल. श्रद्धावंतांनो अवश्‍य कनेक्‍टिव्हीटी साधा. आमचा पासवर्ड ओम राम कृष्ण हरी हा मंत्र! हा झूमचा पासवर्ड नव्हे !

परदेशात नोकरीची संधी

मेष : सप्ताह मोठ्या सुंदर ग्रहयोगांचा, तरुणांना मंगळशुक्र योगाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तमच! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी लाभ घ्यावाच. नोकरीत मोठे भाग्योदय. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताह पर्वणीचा. व्यावसायिकांचे लॉक डॉऊनमध्येही खुल जा सिम्‌ सिम्‌! ता. १२ ते १४ या काळात वन डे जिंकणारच आहात. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरीची संधी.

नोकरीत स्थिरस्थावर व्हाल

वृषभ : सप्ताहात आधीच्या अडचणींवर मात करणार आहात. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा शेअर चांगलाच वधारणार आहे. मॅरेज मार्केटमध्ये भाव वाढेल. अर्थातच विवाहस्थळांकडे लक्ष द्या. बुध-गुरू शुभयोग कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत स्थिरस्थावर करेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळशुक्रांच्या पार्श्‍वभूमीवर वैवाहिक जीवनात होले होले!

सप्ताहात रेकॉर्डब्रेक यश मिळेल.

मिथुन : सप्ताहात राशीचक्रातील मानांकन घेणारी रास ! बुध गुरू शुभयोग आणि मंगळशुक्रांचे फील्ड मोठे अद्‌भुत राहील. रेकॉर्डब्रेक यश मिळेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकातून दिव्य शक्ती प्राप्त होईल. . फालतू जनसंपर्क टाळाच. तरुणांनो ध्येयाकडे वाटचाल होणार आहे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी मिळेल. आर्दा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी!

नोकरीत चमत्कार घडवणारा काळ

कर्क : मंगळशुक्र सहयोगाचे उत्तम फील्ड राहील. विवेकवंत मंडळी त्याचा उत्तम लाभ घेतील. घरी व दारी फालतू राजकारण टाळा. ध्येयाकडे लक्ष द्या. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ ते १४ दरम्यान नोकरीत चमत्कार घडवणारा कालखंड. व्यावसायिकांची वसुली होईल. स्रीवर्गाकडून काम. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची पुत्रचिंता जाईल. शनिवार संध्याकाळ मोठ्या सुवार्तेची.

कार्यक्षेत्रात यश देणारे दिवस

सिंह : गुरूंशी होणारे शुभयोग तरुणांमध्ये जान आणतील. उत्तम गुरू भेटतील. तरुणांनी प्रेम प्रकरणात वेळ घालवू नये. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ ते १४ हे दिवस आपापल्या कार्यक्षेत्रात यश देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह आपल्या कलागुणांतून प्रकाशात आणणारा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचितीयेईल.

चौकार - षटकार ठोकाल

कन्या : ग्रहांचे फील्ड सप्ताहात मोठे मजेदार राहील. मार्केटिंग यशस्वी होईल. नोकरीत छाप पाडाल. टार्गेट पूर्ण कराल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड फॉर्मात येईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ मिळेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १२ ते १४ या दिवसांत मोठे चौकार षटकार ठोकतील! एखादी लव्हस्टोरी फुलेल!

व्यावसायिक वसुली होईल

तूळ : रवि गुरू बुध आणि नेपच्यून यांचे एकमेकांतील योग मोठे सहयोग देणारे. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशगमनाची संधी. ता. १३ व १४ हे दिवस मोठी मजेदार फळं देतील. मुलाखती यशस्वी होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना राजकारणी व्यक्ती वश होतील. तरुणांचा आत्मविश्‍वास वाढेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह व्यावसायिक वसुलीचा. मात्र जुगार टाळा.

आरोग्याच्या चिंता जातील

वृश्‍चिक : सप्ताहात मंगळ शुक्रयोगाचे पॅकेज पूर्णपणे आपल्या राशीवर सुंदर अंमल करेल. शेअर मार्केटमधून लाभ. प्रॉफिट घेऊन मोकळं व्हा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींस इन्युनिटीचा सेकंड डोस मिळेल ! अनुराधा नक्षत्राच्या स्वतंत्र व्यावसायिकांना ता. १२ ते १४ हे दिवस सर्वार्थाने छान. नोकरीत कौतुक. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची आरोग्य चिंता जाईल.

व्यावसायात बुस्टर डोस मिळेल

धनु : रविगुरू यांच्याशी होणारे योग आपणांस निश्‍चितच वलयांकीत करतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १२ ते १४ हे दिवस सर्व स्तरांवर शुभ-विशिष्ट कायदेशीर कटकटी मिटतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक बुस्टर डोस मिळेल. काहींना पुत्रोत्कार्षातून मोठी धन्यता. पती वा पत्नीची चिंता जाईल.

मोठे चमत्कार घडतील

मकर : मंगशशुक्र युतियोगाचे फील्ड चतुर व्यावसायिकांना लाभदायी. योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी राबवा. धनिष्टा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १५ व १६ हे दिवस मोठे प्रवाही राहतील. घरात कार्ये ठरतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात उद्याचा सोमवार मोठे चमत्कार घडवेल. वास्तुयोग.

नोकरीतील विशिष्ट गुप्तचिंता जातील

कुंभ : सप्ताहात एक अष्टमीपर्यंतचा एक प्रवास राहील. रवि आणि गुरू यांच्याशी होणारे योग बुद्धिजीवी मंडळींना छानच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम सहकार्य लाभेल. ता. १२ ते १४ हे दिवस व्यावसायिकांची भाग्यबीजं पेरतील. शततारका नक्षत्राच्या तरुणांना ध्येयपथावर वाटचाल करून देईल. नोकरीतील विशिष्ट गुप्तचिंता जाईल. शनिवार मोठ्या सुवार्तेचा.

पती - पत्नीचा भाग्योदय होईल.

मीन : सप्ताहातील मंगळवारची मंगळशुक्र युती आपणास विशिष्ट यशाची ग्वाही देणारीच. रेवती नक्षत्राचे तरुण आपल्या ध्येयाकडे झेपावतील. व्यावसायिकांना हा सप्ताह आर्थिक ओघ देईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती ता. १५ व १६ हे दिवस मोठे यशदायी ठरतील. पती - पत्नीचा भाग्योदय होईल.

loading image