esakal | जाणून घ्या तुमचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य (८ ते १४ नोव्हेंबर २०२०)
sakal

बोलून बातमी शोधा

weekly-horoscope

माणूस हे एक चैतन्य आहे आणि हे चैतन्य पृथ्वीचा आधार घेत आद्यपुरुषाशी नातं जपून असतं. त्यामुळंच पिंड बदलतो, परंतु गोत्र बदलत नाही! गोमाता ही पृथ्वीवरील तेजसंपत्ती आहे आणि गोमाता पृथ्वीवर अनेक वासरांना जन्म देते.

जाणून घ्या तुमचा आठवडा कसा असेल : साप्ताहिक राशिभविष्य (८ ते १४ नोव्हेंबर २०२०)

sakal_logo
By
श्रीराम भट

खऱ्या अर्थानं गोत्रज होऊ या !
आपली ग्रहमाला हे एक कुटुंब आहे. सूर्याचं एक चैतन्य पृथ्वीनामक घरट्यात वास करून असतं. पृथ्वीच्या घरट्यातला हा चैतन्यपक्षी नेहमीच सूर्योदयी आनंदित होत असतो आणि मधुर स्वर आळवत असतो; आणि संध्यासमयी हाच चैतन्यपक्षी पृथ्वीनामक घरट्यात सुषुप्ती अनुभवत असतो. सूर्यालासुद्धा पृथ्वीची भावोत्कटता प्रफुल्लित करत असते. सूर्य पृथ्वीच्या रूपानं एका भावजीवनाचा साक्षी होत असतो. शिव हेसुद्धा चैतन्य आहे आणि जीव हेसुद्धा एक चैतन्यच आहे. त्यामुळंच हे दोन्ही चैतन्यपक्षी आपापल्यापरीनं भावजीवन जगत असतात. त्यामुळंच जीव आणि शिव एकाच चैतन्यातून एकत्व अनुभवू शकतात. चैतन्य ही एक भावावस्थाच आहे. भावचैतन्य हे शब्दांत वर्णन करता येत नाही. जीवन हा एक भाव आहे, तो शब्द नव्हे. किंबहुना भाव हा आधी आहे. भावाला शब्द देणारा माणूस पृथ्वीतत्त्वाचा आहे, त्यामुळंच जीवलोक म्हणजे पृथ्वी होय. पृथ्वीवर भाव नांदत असतो आणि या पृथ्वीवर भावामुळं शब्दाचा आवाज चालतो.

माणूस हे एक चैतन्य आहे आणि हे चैतन्य पृथ्वीचा आधार घेत आद्यपुरुषाशी नातं जपून असतं. त्यामुळंच पिंड बदलतो, परंतु गोत्र बदलत नाही! गोमाता ही पृथ्वीवरील तेजसंपत्ती आहे आणि गोमाता पृथ्वीवर अनेक वासरांना जन्म देते. परंतु, त्यांचं गोत्र हे आदिपुरुषाचंच आहे. गोमातेचा गायत्रीशी संबंध आहे. प्रकृती ही ब्रह्मा, विष्णु आणि महेश या बालकांना जन्म देते. ही बालकं परात्पर पुरुषाच्या एकाच चैतन्याची नाळ पकडून समान गोत्रज होत असतात.  दीपावली हा सणांचा राजा आहे आणि या राजाच्या राज्याभिषेकाचा वर्धापन दिन धनधान्य समृद्धीनं साजरा करण्यात येत असतो. दीपावलीच्या उत्सवाचा प्रारंभ वसुबारसेचा मुहूर्त साधत होत असतो. कन्या ही रास पृथ्वीची आहे आणि पृथ्वीवरील गोमाता हीच जणू पृथ्वीवरील आद्य जननी होय. परमात्म्याचं तेज पृथ्वीच्या गर्भात प्रविष्ट झाल्यानं अष्टवसूंचा जन्म झाला. वसुबारसेच्या दिवशी गोवत्स पूजन करताना हाच भाव असतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मित्रहो, यंदाची गुरुद्वादशी ता. १२-११-२०२० च्या गुरुवारी आली आहे. गुरू धनू राशीत असताना ता. १२ ची ही गुरुद्वादशी आणि ता. १३ ची त्रयोदशी मोठी अलौकिकच म्हणावी लागेल. प्रत्येक जिवाचं शिव हेच गोत्र म्हणावं लागेल. त्यामुळंच या महाचैतन्याच्या गोत्राचा धागा जपत यंदाची वसुबारस आपण साजरी करूया!

व्यावसायिकांना चांगला काळ
मेष :
दीपावलीच्या पूर्वसंध्येचा हा सप्ताह संमिश्र स्वरूपाचाच. वैवाहिक जीवनातील भावसंबंध जपावेच. सप्ताहात ग्रहयोगांतर्गत ताण राहीलच. स्त्रीशी गैरसमज टाळा. बाकी ता. १३ नोव्हें. २० ची धनत्रयोदशी व्यावसायिकांचं खुल जा सिमसिम करणारी. उत्तम शुभारंभ. कृत्तिका नक्षत्रास ता. १२ व ता. १३ हे दिवस दैवी चमत्काराचे.

दुखापतीपासून काळजी घ्या
वृषभ :
सप्ताहात विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीतून लाभच उठवणार आहात. सप्ताहात बुध, शुक्रांची स्थिती मोठी मजेदार राहील. मृग नक्षत्र व्यक्ती पूर्णपणे लाभ उठवतील. ता. ११ ते ता. १३ नोव्हें. २० हे दिवस दीपावलीचं मांगल्य वाढवणारेच. कृत्तिका नक्षत्रव्यक्तींनी दुखापतीपासून जपावं. मात्र, व्यावसायिक मोठी प्राप्तीची धनत्रयोदशी.

नोकरी लागल्याचा आनंदक्षण
मिथुन :
बुध-शुक्रांची स्थिती अफलातून राहील. पुनर्वसू व्यक्तींना गुरू-शुक्राची स्थिती पूर्वसुकृत फळाला आणणारी. पुत्रपौत्रांचा भाग्योदय. मृग नक्षत्रव्यक्ती नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करतील. आर्द्रा नक्षत्राचा गृहप्रवेश. ता. १२ चा गुरुवार आपल्या राशीस एकूणच शुभलक्षणी. सुवार्तांचा भर.

परदेशात भाग्योदयाची शक्यता
कर्क :
व्यावसायिकांना दीपावलीची पूर्वसंध्या मोठी शुभ राहील. ता. ११ व ता. १२ हे दिवस शुभग्रहांच्या खेळीचे. विवाहेच्छूंच्या आणाभाका. आश्‍लेषा नक्षत्रास मोठी आश्‍वासनं मिळतील. व्यावसायिक वसुली होईल. पुष्य नक्षत्राच्या तरुणांचा परदेशी भाग्योदय. शनिवारी प्रवासात जपा. लहान मुलांना जपा.

धनत्रयोदशीतून श्रीमंती लाभेल
सिंह :
गुरू-शुक्राची स्थिती मोठी शुभ राहील. ता. ११ ते ता. १३ नोव्हें. २० हे दिवस तरुणांना वैयक्तिक सुवार्तांतून रोषणाईचे. पूर्वा नक्षत्रास यंदाची दीपावली पुत्रोत्कर्षातून साजरी होईल. उत्तरा नक्षत्रास यंदाचा धनत्रयोदशीचा शुक्रवार श्रीमंतांच्या यादीत टाकेल. मात्र, शनिवारी भाजण्या-कापण्यापासून जपा.

वास्तूच्या समस्या सुटतील
कन्या :
ग्रहांचं फिल्ड मोठं उसळतं राहील. व्यावसायिकांना यंदाची दीपावली नैराश्‍य घालवणारी. वास्तूविषयक प्रश्‍नातून सुटका होईल. चित्रा नक्षत्रव्यक्तींचं तारुण्य बहरेल. विवाह प्रस्तावांकडं लक्ष द्या. हस्त नक्षत्रास ता. ११ ते ता. १२ नोव्हें. २० हे दिवस घरातील सुवार्तांतून फुलबाजा लावणारे. नवपरिणितांचा भाग्योदय.

नोकरीत कर्तृत्वाला उजाळा
तूळ :
मंगळ आणि शुक्र या ग्रहांची पार्श्‍वभूमी तरुणांना संमिश्ररीत्या फलदायी होऊ शकते. प्रेम प्रकरणं सांभाळा. भावनोद्रेक टाळा. बाकी ता. ११ ते ता. १३ हे दिवस शुभ ग्रहांच्या परस्पर सहकार्यातून उत्तमच. स्वाती आणि विशाखा नक्षत्रव्यक्ती लाभ उठवतील. नोकरीतील कर्तृत्वाला उजाळा मिळेल. चित्रा नक्षत्रव्यक्ती सेलिब्रिटी होतील.

प्रतिष्ठा वाढविणारा कालखंड
वृश्‍चिक :
सप्ताहातील ग्रहयोगांचं फिल्ड आपणास पूर्णपणे अनुकूल राहील. मंगळ, शुक्र प्रतियुती व्यावसायिक उत्सव प्रदर्शनांतून जबरदस्त क्‍लिक होईल. ज्येष्ठा व्यक्तींचा दिमाख वाढेल. ता. १२ चा गुरुवार नक्षत्रलोकांतून लाभ होईल. अनुराधा नक्षत्रास दीपावलीची पूर्वसंध्या प्रिय व्यक्तींच्या भाग्योदयातून भावोत्कट राहील.

ध्येयासाठी प्रयत्न मार्गी
धनू :
सध्याचा आपल्या राशीतील धनुर्धारी गुरू जीवनातील ध्येयपथावर निश्‍चितच मार्गस्थ करेल. ता. ११ ते ता. १३ हे दिवस एकूणच जीवनातील मधुर क्षणांतून भारलेले राहतील. सप्ताहात गुरू आणि मंगळ यांच्या फिल्डवर चंद्र, शुक्राच्या कला बहारदार रोषणाई करतील. पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा व्यक्तींना मोठा बूस्टर डोस!

दीपावली ऐश्‍वर्यसंपन्नता आणेल
मकर :
साडेसाती ही माणसाची आत्मनिरीक्षणातून प्रगती करत असते. तरुणांनो सप्ताह आत्मजागृतीचाच ठरणार आहे. जीवनाचं तत्त्वज्ञान कळून आनंद होईल. श्रवण नक्षत्रास यंदाची दीपावली ऐश्‍वर्यसंपन्न करणारी. धनिष्ठा नक्षत्रास ता. ११ ते ता. १२ हे दिवस सर्वार्थांनी शुभलक्षणी. शनिवारी वाहनं जपा.

बुद्धिचातुर्यातून लाभ होतील.
कुंभ :
सध्या ग्रहांची टाइट फिल्डिंग अनुभवणारी राशिचक्रातील एकमेव रास. अशा परिस्थितीतही गुरुभ्रमणाचं एक अदृश्‍य पॅकेज अस्तित्वात आहेच. त्यामुळंच तुम्ही फिल्डवर टिकून आहात. सप्ताहात मंगळ-शुक्राच्या ग्रहयोगातून स्वतंत्र व्यावसायिकांना तेजी जाणवेल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रव्यक्तींना बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ होतील. ता. ९ ते ता. १० हे दिवस धनवर्षावाचे.

कलाकारांना मोठ्या संधी 
मीन :
सध्याचा धनुर्धारी गुरू यंदाच्या दीपावलीत आपणास गॉडफादरच राहील. शिवाय, सप्ताहातील चंद्र-शुक्राच्या कला गुरूचं वैभव दाखवून देतील. सप्ताहात रेवती नक्षत्र बलसंपन्न होईल. पूर्वाभाद्रपदाच्या तरुणांना नोकरी. उत्तराभाद्रपदाचा परिचयोत्तर विवाहयोग. कलाकारांचा मोठा भाग्योदय.