Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य - धागा श्रद्धेचा जपावा लागणार!

माणसाचा शब्द किंवा त्याची वैखरी वाणी नेहमी अभिप्रायांची अपेक्षा करते.
Weekly Horoscope
Weekly Horoscopeesakal
Summary

ज्ञान आणि पंचमहाभौतिक ‘विज्ञान’ (Science) यांचा पक्का संबंध कळल्यावर किंवा त्या मागचं पूर्ण सत्य कळल्यावर ही सत्ची धारणाच श्रद्धा बनते.

-श्रीराम भट

Horoscope : पंचमहाभुतांच्या विशिष्ट समन्वयातून हे विश्व निश्चितच मार्गक्रमण करत असते म्हणा किंवा विशिष्ट कक्षेत फिरत असते म्हणा. माणसाचा जसा एक पंचभौतिक देहाचा पिंड नांदत असतो, तसेच या सूर्यमालेचं एक सत्र या पंचमहाभौतिक दैवतांच्या हातात असतं. त्यामुळेच हे सूत्र पकडूनच पृथ्वी आपल्या पर्यावरणाचा कोश सांभाळत सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळंच माणसाच्या जीवनाचं सूत्र निश्चितच अप्रत्यक्षरीत्या ग्रहमालेच्या किंवा आकाशस्थ देवदेवतांच्या ताब्यात असतं हे नाकारण्यात काहीच अर्थ नाही.

‘श्रद्धावान लभते ज्ञानम्’ असं गीता ठामपणे सांगते. ज्ञान आणि पंचमहाभौतिक ‘विज्ञान’ (Science) यांचा पक्का संबंध कळल्यावर किंवा त्या मागचं पूर्ण सत्य कळल्यावर ही सत्ची धारणाच श्रद्धा बनते. मग ती अंधश्रद्धा होतच नाही. पंचमहाभुतांमधील आकाशानं व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्त होण्याला अवकाश दिल्याशिवाय व्यक्तीच्या व्यक्तित्त्वाचं भाषण किंवा संभाषण होऊच शकत नाही. माणसाचा शब्द किंवा त्याची वैखरी वाणी नेहमी अभिप्रायांची अपेक्षा करते. परंतु अज्ञानी किंवा मूर्ख माणसाला हे कळत नसते, की आपल्याला बोलायला अवकाश देणारे आकाश आपल्या स्तुती पाठकालाही स्तुती करण्यासाठी अवकाशच देत असते किंवा ते अवकाश दिल्याशिवाय तो आपली स्तुती करणार तरी कशी हो!

Weekly Horoscope
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

माणसाचा लिंगदेह हे एक मिटलेलं कमळ आहे. या कमळात माणसाचं मन एकप्रकारे एका चिदभ्रमरासारखे बंदिस्त असतं आणि त्याचा गुंजारव होतो, तो आकाशाच्या पोकळीचा आधार घेतच आणि खरं आत्मज्ञान झाल्यावर हे खोटे देहाकाराचे गुंजन, प्रतिध्वनी किंवा प्रतिसाद आकाश होऊनच आकाशात विलीन होत असतात. असाच ज्ञानेश्‍वरीतील एका ओवीचा निष्कर्ष आहे.

मित्र हो, ज्योतिष (Astrology) हे माणसातील ज्ञान आणि अज्ञान ओळखणारं अध्यात्मच म्हणावं लागेल. त्यामुळंच ते वेदांग आहे. माणसाचा अहंकार, माणसाचा भ्रम आणि माणसाची अविद्या किंवा अंधश्रद्धा माणसाला नरकवास भोगायला लावते. सप्ताहातील गुरुच्या मीन राशीतील मंगळ-नेपच्यून युतियोगाच्या पार्श्वभूमीवर होणारी ग्रहस्थिती पाहता माणसाला आपली श्रद्धा जपणं उत्तरोत्तर अवघड होत जाणार आहे. माणसातील अहंकाराचा आगडोंब आणि त्याचं मृगजळाच्या पाठीमागं धावणं, त्याची तहान भागवणार तरी कशी!

महत्त्वाच्या गाठीभेटी होतील

मेष : सप्ताहारंभ अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या गाठीभेटी घडवून आणेल. घरातील तरुणांचे विवाह ठरवाल. मात्र सप्ताहात भाजण्या, कापण्यापासून सावधानता बाळगा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठ्या मौजमजेचा. ता. १ व २ हे दिवस वैयक्तिक उत्सव समारंभांचे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार मोठ्या करार-मदारांचा ठरेल.

भावा-बहिणीशी वाद टाळा

वृषभ : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळ-नेपच्यून युतियोगातून एक प्रकारचं हाय व्होल्टेज राहील. वादग्रस्त गाठीभेटी सांभाळा. भावा-बहिणींशी वाद टाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस नोकरीच्या व्यावसायिक पार्श्वभूमीवर प्रसन्न ठेवतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार विशिष्ट कर्ज मंजुरीतून लाभ देईल. काहींची पर्यटनं होतील.

व्यावसायिक लाभ होतील

मिथुन : सप्ताह शुभ ग्रहांच्या छान साथसंगतीचा, मात्र सप्ताहात एकूणच कामगारांशी जपून वागा. सप्ताहात धारदार वस्तू सांभाळा. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ छान व्यावसायिक लाभ देईल. आजचा रविवार भाग्यबीजं, प्रसिद्धी योग आणेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींवर पूर्ण गुरुकृपा होईल. एखादे कायदेविषयक प्रकरणं मिटेल.

व्यवसायात तेजी अनुभवाल

कर्क : सप्ताहात शुभ ग्रहाचं फिल्ड मोठं अनुकूल वातावरण ठेवेल. पती वा पत्नीचा भाग्योदय. महाराष्ट्र दिन साजरा कराल. सहली करमणुकीतून प्रसन्न वातावरण राहील. पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात व्यवसायात तेजी अनुभवायला मिळेल. ता. १ व २ हे दिवस आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना विजयोत्सवाचे, मात्र सप्ताहात उष्णताजन्य विकार साभाळा. ज्वर-पीडा होऊ शकते. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पित्तप्रकोपाची शक्यता.

Weekly Horoscope
CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

परदेशात नोकरी मिळेल

सिंह : मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वराची पीडा शक्य. सप्ताहात उष्माघातापासून सांभाळा. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमण व्यावसायिक पार्श्वभूमीवर छानच राहील. सप्ताहारंभ वादग्रस्त वसुली करेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी करणारे. तरुणांना परदेशात नोकरी मिळेल. मात्र शनिवार एकूणच आपल्या राशीस प्रदूषित वातावरणाचा राहील.

वास्तुविषयक व्यवहारात दिलासा

कन्या : सप्ताह शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर खराबच वाटतो. कोणतेही वाद वाढवू नका. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी नव परिणितांशी घरात संशयास्पद वागू नये. बाकी ता. ३० ते २ हे दिवस हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना घरात आनंदोत्सवाचे. मौल्यवान बाबींची खरेदी होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारांतून मोठा दिलासा मिळेल. विशिष्ट वसुली होईल. पुत्रांच्या बाबतीतल्या चिंता जातील.

नोकरीच्या मुलाखतीत यश

तूळ : सप्ताह चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना रंगीबेरंगी फळे देईल. अर्थातच सप्ताहारंभ तरुणांना प्रेमाचे धागे जुळवून देणारा. मात्र सप्ताहात उधार-उसनवारीपासून जपा. ता. ३० चा बुधवार स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना थोरा-मोठ्यांच्या ओळखीतून लाभ देईल. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ व २ हे दिवस हृद्य गाठीभेटी घडवतील. पती वा पत्नीची चिंता जाईल.

कर्ज मंजूर होईल

वृश्चिक : सप्ताहात गर्भवतींनी काळजी घ्यावी. सप्ताहात उष्णताजन्य विकार जोर धरतील. बाकी गुरुच्या राश्यांतरातून विशाखा नक्षत्राच्या तरुणांचं विशिष्ट शुभपर्व सुरू होईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचे विशिष्ट रेंगाळलेले खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बँकेकडून कर्जमंजुरी होईल. मात्र शनिवारी यंत्र, विद्युत आणि वाहनं यांच्यापासून सांभाळा.

Weekly Horoscope
Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

सरकारी कामांना गती येईल

धनु : सप्ताहारंभ शुभग्रहांच्या माध्यमातून उत्तम बोलेल. सरकारी कामांना गती मिळेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विवाहविषय गाठीभेटींचा. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार विशिष्ट आदरसत्कारातून धन्य करेल. पुत्रचिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. शनिवार प्रवासात अडचणीचा. रस्त्यावरील बाचाबाची टाळा. पोलिसांपासून सांभाळा.

मित्रमंडळींशी वाद टाळावेत

मकर : सप्ताहातील शुभग्रहांची फिल्ड ॲरेजमेंट अनुकूलच राहील. मात्र तरुणांनी वाहनं सांभाळावीत. मित्रमंडळींशी वाद टाळावेत. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना महाराष्ट्र दिनाचा दिवस अतिशय शुभलक्षणी. ता. ३० ची संध्याकाळ महत्त्वाच्या गाठीभेटींची. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्री वर्गाशी गैरसमज टाळावेत. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना मंगळवार घरातील तरुणांच्या संदर्भातून भाग्योदय घडवणारा.

प्रलोभनांपासून जपून राहावे

कुंभ : सप्ताहारंभ व्यावसायिक वसुली करून देणारा. सोमवार शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना गाठीभेटीतून निश्चितच फलदायी होईल. विशिष्ट उंची खरेदी होईल. सरकारी कामं मार्गी लागतील. ता. ३ चा शुक्रवार तरुण वर्गाच्या सुवार्तांतून जल्लोषाचा राहील. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगारसदृश व्यवहार टाळावेत. प्रलोभनं टाळावीत. शनिवारी भांडणं टाळावी. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी पाकीट जपावं.

उष्णताजन्य विकारांपासून जपावे

मीन : ग्रहयोगाचं फिल्ड संमिश्र स्वरूपाची फळं देईल. उष्णताजन्य विकार सांभाळावेत. प्रवासात चीजवस्तू सांभाळा. सप्ताहारंभ उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या साथसंगतीचा. नोकरीतील घडामोडी प्रसन्न ठेवतील. विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० एप्रिलचा मंगळवार सूर्योदयी मोठ्या सुवार्तांचा. सरकारी माध्यमांतून लाभ. तरुणांना ओळखी-मध्यस्थीतून नोकरीचा लाभ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com