
निकल न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांचे आहारविषयक हे पुस्तक. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात आणि विविध नियतकालिके यातून वेगवेगळ्या डॉक्टरांनी जेवण्याच्या वेळा आणि जेवण किती वेळा घ्यावे यासंबंधीचे तपशील दिलेले असतात. त्यावरून आम्ही कुणाचे डायट पाळतो ते सांगणारे लोक त्यावर चर्चा करणारे आणि आपलाच आहार कसा योग्य असे सांगणारे लेख, माहितीचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. हे पुस्तक या सगळ्यांपेक्षा वेगळे असे आहे. मात्र हे पुस्तक खरोखर तुम्ही काय खायला हवे आणि ते देखील कसे खायला हवे, याबद्दल नेमकं मार्गदर्शन करते. आपल्याला दैनंदिन आयुष्यात पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेऊन त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.