
Welcome new books
sakal
निसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील डॉ. गायत्री व गुरुदास हर्षे ह्या दांपत्याने शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका प्रदेशाचा प्रवास केला. त्यांच्या प्रवासाची ‘अलौकिक अंटार्क्टिका’ ही साहसकथा वाचताना वाचकाला त्या रोमांचक थराराचा अनुभव येतोच, पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीची माहितीही मिळते. बर्फाळ प्रदेश आणि विषम हवामान असलेल्या अंटार्क्टिका प्रदेशात २१ दिवस राहणं हे खचितच सोपं नाही. त्यासाठी केलेली पूर्वतयारी, अभ्यास, प्रवासात आलेली आव्हाने, जबाबदारी आणि अनुभव हे एकत्रितपणे ‘अलौकिक अंटार्क्टिका’ या पुस्तकात देण्यात आले आहे.
वैशिष्ट्य : अंटार्क्टिका प्रवासाच्या सविस्तर माहितीसह नकाशा, छायाचित्रे, संदर्भसूचीही उपलब्ध.
प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १३२ मूल्य : २४० रु.