Pravasi Bhartiya Divas 2021 : प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीलाच का साजरा करतात? जाणून घ्या सर्वकाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravasi Bhartiya Divas 2021

प्रवासी भारतीय दिवस 9 जानेवारीलाच का साजरा करतात? जाणून घ्या सर्वकाही

Pravasi Bhartiya Divas 2021 : भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता, या दिवसाला एक विशेष महत्त्व असून हा दिवस पहिल्यांदा 2003 मध्ये साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जात आहे, आज 17 वा भारतीय प्रवासी दिवस साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आज आपण जाणून घेणार आहोत.

भारताच्या विकासात योगदान दिलेल्या परदेशात राहाणाऱ्या भारतीयांचा सन्मान करणे हा या दिवसामागचा प्रमुख उद्देश असतो. अनिवासी भारतीयांसाठी हा दिवस खास आहे कारण देशाबाहेर राहूनही ते भारताच्या विकासात भर घालतात, देशाचे नाव मोठे करत असतात. या दिवसाचे आयोजन भारत सरकारकडूनही केले जाते.

या दिवसांचे महत्व काय आहे?

खरंतर 9 जानेवारीला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, म्हणूनच 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. गांधी भारतात परत येणे आपल्या देशासाठी एक महत्वाची घटना ठरली. त्यानंतरच गांधीनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लढा दिला. म्हणूनच भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी 9 जानेवारीला साजरा केला जातो.

हा दिवस साजरा केला जातो, जेणेकरून परदेशात राहाणाऱ्या भारतीयांच्या मनात भारताबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त होण्यासोबतच त्यांचा देशवासीयांशी सकारात्मक संवाद व्हावा. त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा. हा दिवस साजरा करण्याचा आणखी एक उद्देश असाही असावा की, देशातील तरुण पिढीला परदेशात काम करत असलेल्या भारतीयांशी सुसंवाद होत राहील त्यांचे योगदान तरुणांपर्यंत पोहचेल. प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना दिवंगत लक्ष्मीमल सिंघवी यांनी मांडली होती.

प्रवासी भारतीय सन्मान (Pravasi Bharatiya Samman)

जे लोक भारताबाहेर स्थायिक झाले आणि जगातील इतर देशांमध्ये स्थायिक झाले त्यांना प्रवासी भारतीय असे म्हणतात. अशा नागरीकांना 'प्रवासी भारतीय सन्मान' हा भारत सरकारडून दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार प्रवासी भारतीयांना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखणीय योगदानाबद्दल दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी 9 जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो.

हे नागरीक परदेशात राहूनही परदेशातील भारतीयांनी आपला सांस्कृतिक आणि भाषिक वारसा जपल्यामुळे भारताची त्या-त्या देशात स्वतःची ओळख टिकून राहते. अमेरिका, चीन, रशिया, जपान असे काही देश आहेत, जिथे भारतासह जगभरातून मोठ्या संख्येने स्थलांतरित होतात.

देशाच्या प्रगतीत मोठे योगदान

रोजगाराच्या शोधात भारतातील अनेक लोक मोठ्या संख्येने परदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत. तेथे ते चांगल्या पदांवर काम करत आहेत आणि आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. देशाच्या प्रगतीत परदेशात राहत असलेल्या भारतीयांचा मोठा वाटा मानला जातो. भारतीय प्रवासी नागरीक परदेशात राहून त्यांच्या क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करतात आणि परकीय चलन भारतात पाठवण्यात जगभरात आघाडीवर आहेत.

प्रवासी भारतीय दिवसाचा उद्देश

  • भारताप्रती अनिवासी भारतीय आणि देशवासीय यांच्या विचार, भावना आणि सकारात्मक संवाद व्हावा यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

  • जगातील सर्व देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे नेटवर्क तयार करणे.

  • तरुण पिढीला स्थलांतरित झालेल्या नागरिकांशी जोडणे.

  • परदेशात राहणाऱ्या भारतीय कामगारांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे.

  • अनिवासी भारतीय लोकांना त्यांच्या देशाकडे आकर्षित करणे, त्यांचे संबंध टिकवूण ठेवणे.

  • गुंतवणुकीच्या संधी वाढवणे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India
loading image
go to top