
ऋचा थत्ते
rucha19feb@gmail.com
लेखन आणि बोलण्याच्या कलेतून प्रकट होण्यासाठी आपण नेहमीच शब्दांचं बोट धरतो. किंबहुना एरवीही कोणत्याही संवादात शब्दांचाच आधार आपण घेतो; पण समोरासमोर बोलताना शब्दांपलीकडेही खूप गोष्टी असतात. जसं म्हणतात, की माणसाचे डोळे नेहमी खरं बोलतात. म्हणजेच डोळे बोलतात. डोळ्यांचीही एक भाषा असते. कधी कधी काही न बोलताही मनातलं खूप काही कळून जातं ते डोळ्यांमुळे. मला माझीच एक चारोळी आठवली.