Premium|AI World Models : शब्दांच्या पलीकडले 'एआय'; जग समजून घेणाऱ्या 'वर्ल्ड मॉडेल्स'ची नवी क्रांती!

Future of Artificial Intelligence : केवळ शब्दांचा खेळ करणाऱ्या 'एलएलएम'कडून (LLM) जग समजून घेणाऱ्या 'वर्ल्ड मॉडेल्स'कडे (World Models) कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवास सुरू झाला असून, यात भारताने केवळ डेटा पुरवठादार न राहता वैज्ञानिक स्वायत्तता मिळवणे काळाची गरज आहे.
AI World Models

AI World Models

esakal

Updated on

संदीप वासलेकर

कृत्रिम बुद्धिमत्तेत वर्ल्ड मॉडेल म्हणजे अशी प्रणाली जी वास्तवाची रचना, वस्तू, नातेसंबंध, भौतिक नियम आणि कृतींचे परिणाम शिकते. जेणेकरून कृती करण्यापूर्वी ती संभाव्य परिणामांची नक्कल करू शकेल. वाक्यातील पुढचा शब्द ओळखण्याऐवजी अशी प्रणाली पुढे काय घडेल याचा अंदाज बांधते. सध्याचे प्रवाह असेच राहिले, तर भारत आणि काही मध्यपूर्व देश डेटा, श्रम आणि ऊर्जा पुरवणारे म्हणून अडकून पडण्याचा धोका आहे. ‘एआय’च्या सर्वांत महत्त्वाच्या स्तरांसाठी ते बाह्य शक्तींवर अवलंबून राहतील. यामुळे सार्वभौमत्व, सुरक्षितता आणि दीर्घकालीन धोरणात्मक स्वायत्तता यावर ताण येऊ शकतो.

मी जानेवारी २०२५मध्ये हा स्तंभ लिहायला सुरुवात केली, तेव्हा मोठी भाषा मॉडेल्स (एलएलएम) हीच चर्चेची केंद्रबिंदू होती. वर्ष पुढे सरकत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नोकऱ्या, सर्जनशीलता आणि जागतिक अर्थव्यवस्था कशी बदलणार यावरच सार्वजनिक चर्चा केंद्रित राहिली. मात्र ‘एआय’ शास्त्रज्ञांच्या एका लहानशा वर्तुळाबाहेर फारच थोड्या लोकांच्या लक्षात आले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आतच एक अधिक खोल आणि अधिक परिणामकारक अशी शांत क्रांती घडत होती. आधुनिक ‘एआय’चे शिल्पकार, ज्यांनी मशिन लर्निंग आणि सर्वसाधारण बुद्धिमत्तेची पायाभरणी केली; त्यांपैकी अनेक शास्त्रज्ञ ‘एलएलएम’पासून दूर जात होते किंवा जाणीवपूर्वक त्यात सहभागी होत नव्हते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com