

World Youth Table Tennis
esakal
भारताच्या युवा खेळाडूंनी रोमेनिया येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक युथ टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तीन विभागांत पदकांवर मोहर उमटवत नवा इतिहास रचला. दिव्यांशी भौमिक हिने १५ वर्षांखालील मुलींच्या विभागात ब्राँझपदक पटकावले. भारताच्या मुलींच्या संघाने १५ वर्षांखालील विभागात ब्राँझपदकावर नाव कोरले. भारताच्या मुलांच्या संघाने १९ वर्षांखालील विभागात रौप्यपदकाची माळ गळ्यात घातली. युवा खेळाडूंच्या संस्मरणीय कामगिरीमुळे टेबल टेनिस या खेळातील भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.