प्रतिबंध हाच उपचार...

जीवनात कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी सुदृढ शरीर ही अगदी मूलभूत गरज आहे. पण, उशिरा झोपणे, उशिरा झोपेतून उठणे, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव यातून नैसर्गिक जीवन जगण्याची नाळ तुटली.
aarogyache sanvidhan book
aarogyache sanvidhan booksakal
Summary

जीवनात कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी सुदृढ शरीर ही अगदी मूलभूत गरज आहे. पण, उशिरा झोपणे, उशिरा झोपेतून उठणे, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव यातून नैसर्गिक जीवन जगण्याची नाळ तुटली.

जीवनात कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी सुदृढ शरीर ही अगदी मूलभूत गरज आहे. पण, उशिरा झोपणे, उशिरा झोपेतून उठणे, अयोग्य आहार, मानसिक ताणतणाव यातून नैसर्गिक जीवन जगण्याची नाळ तुटली. त्याचा दृष्य परिणाम लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, निद्रानाश, नैराश्य अशा असंसर्गजन्य आजारातून दिसतो आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या उद्रेकात आपले शरीराचा खऱ्या अर्थी कस लागला.

आपल्याला मधुमेह आहे का, हृदयविकाराने ग्रासले आहे का, अशा सहव्याधी असलेल्यास उपचाराची गुंतागुंत वाढली. कोरोनानंतर आता आरोग्याबाबत जागृती वाढली आहे. त्यातील संवेदनशीलता प्रकर्षाने समोर आली आहे. आरोग्याचे महत्त्व ओळखलेल्या प्रत्येकासाठी ‘आरोग्याचे संविधान’ हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.

मधुमेह, उच्चरक्तदाब अशा असंसर्गजन्य आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्रात दर्जेदार औषधे उपलब्ध आहेत. पण, हे आजार पूर्णपणे बरे करता येतील अशी उपचार पद्धती वैद्यकशास्त्रात नाही. त्यामुळे हे आजार होणार नाहीत. त्याला प्रतिबंध करणे हाच काय तो पर्याय आपल्या हातात रहातो. अशा वेळी हा वाचकांसाठी दिशादर्शक ठरतो.

आपल्या पोटात जाणारा प्रत्येक घासातून शरीरात ऊर्जा निर्माण होत असते. त्यातून सत्त्व शरीराला मिळत असता. त्यातून रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र असे सप्त धातू तयार होतात. दिनचर्या, रात्रीचर्या आणि ऋतूचर्या आधारित जीवनशैली आधुनिक काळात बाजूला पडली आहे. स्पर्धेच्या युगात कामाच्या वेळा वाढल्या आहेत. मोबाईलचा वापर वाढला आहे. जेवण्याच्या, झोपण्याच्या वेळा अनियमित झाल्या आहेत. नियमित व्यायामाचा अभाव आहे. या सर्वांतून शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या पार्श्वभूमीवर निरामय आरोग्याचे महत्त्व यात अधोरेखित केले आहे.

देशात भाषा, प्रांत, जात, धर्म, वर्ण आणि वर्ग यात वेगळेपणा आहे, असे असूनही भारतीय संविधानाच्या आधारावर राज्यकारभार सुरळीत सुरू असतो. त्याच धर्तीवर शरीराच्या रचनेत वेगवेगळ्या अवयवांचा समावेश असला तरीही शरीररचना सुरळीत राहाणे आवश्यक असते. त्यासाठी आरोग्याच्या मूलभूत तत्त्वांचे, नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते. हे नियम नेमके काय आहेत, हे ‘आरोग्याचे संविधान’मधून सोप्या पद्धतीने उदाहरणे, दाखले देऊन स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंतःकरणात डोकावून आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची संधी हा ग्रंथ उपलब्ध करून देतो.

हा ग्रंथ सात विभागात विभागला आहे. ‘निरामय आयुष्यासाठी आरोग्य’, ‘आरोग्यपूर्ण जीवनशैली’, ‘अन्न हेच पूर्णब्रम्ह’, ‘व्यायाम आणि योग्यभ्यास’, ‘आजार आणि उपचार’, ‘आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती’ आणि संकीर्ण असे हे विभाग आहेत. ‘आपण आपल्या आरोग्यासाठी रक्षण व्हावे आणि सुखी दीर्घायुष्य मिळावे यासाठी काही गुंतवणूक करतो का,’ हा प्रत्येकाच्या मानाला भिडणारा प्रश्न विचारला आहे.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करतो. बँकेत ठेवी ठेवतो. आयुर्विमा, विमा अशा वेगवेगळ्या गुंतवणूक करतो.

भविष्यात काही आर्थिक संकट येऊ नये, यासाठी हे आपण सगळे करतो. तसेच, व्यायाम, नित्य योग, समतोल आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि ध्यान धारणा ही आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. आरोग्यामुळे जीवनात स्थैर्य प्राप्त होते. तर, अनारोग्यामुळे अस्थिरता निर्माण होते, हा संदेश यातून मिळतो.

साथीचे आजार, विविध रोगांची लक्षणे, कारणे आणि उपाय यावरही या ग्रंथात प्रकाश टाकला आहे. स्त्रियांचे आरोग्याचा स्वतंत्र घटक यात नमूद केला आहे. स्त्री हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे तिच्या आरोग्याची काळजी जास्त महत्त्वाची असल्याने याला स्वतंत्र स्थान दिले आहे. लहान मुलांचे आरोग्य आणि लसीकरण याची माहिती यात दिली आहे.

आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती हे एक याचे वेगळेपण ठळकपणे दिसते. औषधी वनस्पती आधारित रसायनांच्या वापरातून दीर्घायुष्य लाभते. त्याच बरोबर स्मृती, बुद्धी आणि आकलन शक्ती यांची वाढ होते. तसेच, कांती, वर्ण, स्वर यात वृद्धी होते. आरोग्य संरक्षणासाठी योग आणि आयुर्वेद यांच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणाऱ्या विविध पैलूंचा वेध या ग्रंथात मोरे यांनी घेतला आहे.

पुस्तकाचं नाव : आरोग्याचे संविधान

लेखक : डॉ. आनंद मोरे

प्रकाशक : वनराई, पुणे

(०२० -२४४२९३५१, २४४२०३५१)

पृष्ठं : ७२० मूल्य : १००० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com