
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
सरत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दोन युवा खेळाडूंनी भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवला. मूळची साताऱ्याची असलेली आणि आता पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेली १६ वर्षीय शर्वरी शेंडे हिने जागतिक ज्युनियर तिरंदाजी सांघिक विभागात ब्राँझपदक पटकावल्यानंतर वैयक्तिक विभागात सुवर्णपदकावर मोहर उमटवली. सांगलीच्या १७ वर्षीय यश खंडागळे याने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये अजिंक्यपद स्पर्धेतील ज्युनियर विभागात ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. याप्रसंगी या दोन उदयोन्मुख खेळाडूंच्या आतापर्यंतच्या प्रवासावर टाकलेला प्रकाशझोत...