
राजेंद्र पै - editor@esakal.com
आचार्य अत्रे यांचा ‘झेंडूची फुले’ काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊन १०० वर्षे पूर्ण झाली! आचार्य अत्र्यांच्याच शब्दात सांगायचं तर, शंभर वर्षे सतेज राहून फुलणारी अशी फुलं गेल्या दहा हजार वर्षांत कधी झाली नाहीत आणि पुढच्या दहा हजार वर्षांत कधी होणारही नाहीत. असे असले तरी १९२५ साली ही ‘झेंडूची फुले’ आचार्य अत्र्यांनी म्हणजेच कवी केशवकुमारांनी रसिकांना अर्पण करताना अर्पणपत्रिकेत जरा मिश्किलीनेच लिहिले होते.