गत दोन वर्षांत सातारा मुख्य टपाल कार्यालयात या योजनेंतर्गत फेब्रुवारी २०२५ अखेर १०० कोटी ७१ लाख ९४ हजार इतकी गुंतवणूक झाली आहे.
सातारा : महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी एप्रिल २०२३ मध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने (Central Govt) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Yojana) सुरू केली. या योजनेत दोन वर्षांसाठी एक हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतविणाऱ्या महिलेस ७.५ टक्के व्याजासह एकूण परतावा मिळतो. त्यामुळे अल्पावधीतच ही योजना महिलांच्या पसंतीस उतरली.