letters
sakal
सातारा - सातारकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या शहर बस वाहतुकीच्या प्रश्नाची सोडवणूक अत्यंत गरजेची आहे, हे लक्षात घेऊन ‘सकाळ’च्या मोहिमेत सातारकर उत्स्फूर्तपणे सहभागी असतानाच जेन-झी व जेन-अल्फाही पुढे सरसावले. शहरातील शाळा व महाविद्यालयातील तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांनी शहर बसच्या मागणीबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांना पत्र पाठविण्याची मोहीम राबविली. ही मोहीम सुरू असतानाच मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दहा ई-बस मंजूर केल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांना अभिनंदनाची पत्रेही पाठविली.