
कलेढोण : राज्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढून पूर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना यावर्षीपासून त्यांचे गुणपत्रक हे डीजी लॉकर या मोबाईल अॅपवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागातील सर्व विभागीय मंडळातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे अपार आयडी अर्थात ऑटोमेटेड परमनंट ॲकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हे संकेतस्थळावर नोंदविण्याच्या सूचना शाळा, महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.