
खंडाळा : तालुक्यातील तिन्ही उपसा सिंचन योजनांबाबत दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया करणार आहे, तसेच तालुक्यातील वंचित १४ गावांचा पाणीप्रश्न या पंचवार्षिकमध्येच मार्गी लावणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी असवली (ता. खंडाळा) येथे नागरी सत्कार कार्यक्रमात बोलताना केली.