
खंडाळा/पुसेगाव : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे स्मारक उभारणीसाठी १४२ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीस, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७.१७ लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्यानंतर नायगावात आनंद व्यक्त करण्यात आला.