Manyachiwadi :दीडशे वर्षांचा वटवृक्ष वणव्यात पेटला, वाचवायला एकवटलं गाव; पारंबी समजून हाती धरला साप अन्....

Satara News : रात्रीची वेळ असल्याने मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र, त्यावर त्यांनी मात केली. आग विझवून युवक झाडावरून खाली उतरत असताना त्यांनी पारंब्यांचा आधार घेतला. त्यावेळी पारंबी समजून एकाने हातात चक्क मोठा सापच धरला.
Villagers risking everything to save a 150-year-old banyan tree in Manchyachiwadi, accidentally grabbing a snake thinking it was a root.
Villagers risking everything to save a 150-year-old banyan tree in Manchyachiwadi, accidentally grabbing a snake thinking it was a root.Sakal
Updated on

ढेबेवाडी : डोंगरालगतच्या शिवारात फैलावलेल्या वणव्यात सापडून पेट घेतलेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या वडाच्या झाडाला ग्रामस्थांनी तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी आगीच्या तांडवातून वाचवून त्याचे अस्तित्व अबाधित ठेवले. मान्याचीवाडी (ता. पाटण) नजीक काल रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली झाड वाचविण्याची धडपड बाराच्या दरम्यान संपली. आगीशी झुंज देताना किरकोळ दुखापत आणि त्रास विसरून गावकऱ्यांनी मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com