Satara News : परीक्षार्थींनो, फोन करा अन् व्‍यक्‍त व्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

17 counselors for 10th 12th students initiative of Education Department

Satara News : परीक्षार्थींनो, फोन करा अन् व्‍यक्‍त व्हा...

सातारा : विद्यार्थ्यांच्या आयुष्‍याला कलाटणी देणारी इयत्ता दहावी, बारावीची परीक्षा तोंडावर आली आहे. त्यामुळे अभ्‍यास करण्यासह परीक्षेवेळी येणारा ताण दूर करत विद्यार्थ्यां‍ना मनमोकळेपणाने भावना व्‍यक्‍त करता याव्‍यात, यासाठी शिक्षण विभागाने जिल्ह्यात १७ समुपदेशकांची नियुक्‍ती केली आहे.

परीक्षा काळात अभ्‍यासाचा तणाव, पालकांच्‍या अपेक्षांचे ओझे, भविष्‍याची चिंता यामुळे विद्यार्थ्यांनी ताण घेऊ नये, यासाठी समुपदेशक कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे अभ्यास, परीक्षेचा ताण घेऊ नका... फक्‍त एक फोन करा अन् व्‍यक्‍त व्‍हा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

सर्वच क्षेत्रात वाढत चाललेली स्‍पर्धा, त्यात स्‍वत:चे अस्तित्व टिकवण्‍यासाठी प्रत्‍येकाची सुरू असलेली धडपड, यामुळे सर्वच क्षेत्रात प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या ताणाला शैक्षणिक क्षेत्रही अपवाद नाही. दहावी, बारावीचे वर्ष हे शैक्षणिक, तसेच भविष्‍यकालीन जीवनाला कलाटणी देणारे असते.

त्यामुळे पालकांबरोबरच विद्यार्थी सर्वच पातळीवर दहावी, बारावीसाठी सजग असतात. दैनंदिन अभ्‍यासाबरोबरच पालक, नातेवाइकांच्या अपेक्षांचे ओझे सांभाळत विद्यार्थी दररोज अभ्यासासाठीची कसरत करतो.

त्यातून अनेकदा विद्यार्थी नैराश्‍‍याच्‍या गर्तेतही ओढले जातात. अपेक्षांच्‍या ओझ्‍यामुळे होणारी घुसमट मनमोकळे पणाने बोलता येत नसल्‍याने अनेकदा परीक्षेच्‍या तोंडावर किंवा परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलतात. अशा गंभीर व दुःखद घटनांचा अनुभव अनेकांनी परीक्षा कालावधीत घेतला आहे.

अशा अप्रिय घटना टाळण्‍यासाठी एससीईआरटीने जिल्‍हावार समुपदेशकांचे जाळे उभारण्‍याचा निर्णय घेतला होता. यानुसार जिल्ह्यात १७ समुपदेशक नियुक्त केले आहेत. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्‍यासाठी हे समुपदेशक सक्रिय झाले आहेत.

परीक्षा आनंददायी वातावरणात पार पडाव्‍यात, यासाठीचा आराखडा जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमिक शिक्षण विभागाने करत शासन आदेशानुसार १७ समुपदेशक नेमले आहेत. कोणत्‍याही वेळी विद्यार्थी त्‍यांच्‍याशी फोनवरून संवाद साधत आलेल्‍या ताणाचे निवारण, नियंत्रण करू शकणार आहे.

कोणताही निर्णय घेण्‍याआधी फक्‍त एक फोन करा... आणि आनंददायी परीक्षा आणि जीवनाच्‍या परीक्षेला सामोरे जा, असे आवाहन समुपदेशकांच्‍या वतीने केले आहे.

समुपदेशक व त्यांचा संपर्क क्रमांक

१) कृष्‍णा बोराटे - ९६५७२८०९२२

२) जगदीश निर्मळे - ८२०८९६३७६६

३) अण्णा शिंदे - ९९७५०१९२०४

४) हमीद इनामदार - ९८२३९३८३७९

५) संभाजी पाटील - ९८६०११९२४४

६) सुनीता केदार - ९८८१७९८७९०

७) विजया निकम - ९८२२३३१८०६

८) सुरेश काटकर - ८८०५३५२४४८

९) शांतिनाथ मल्‍लाडे - ९९२२२११५६४

१०) प्रदीप वाघ - ९८२२५३६१५१

११) रियाज महाफुले - ९४२३८६२८६८

१२) सुनील क्षीरसागर - ९४२३८२६९००

१३) गोपाळराव जाधव - ९४२०२४१९२९

१४) मनोहर तांबे - ९६०४६९७७४९

१५) मानसिंग पवार - ९८२२६०१०८५

१६) एस. आर. पाटील - ९८२२१८२३१२

१७) रमेश हल्‍लोळी - ८९२८७६४२७५

टॅग्स :Sataraeducationstudent