कामाचे श्रेय लाटण्याचा उद्योग पवारांनी बंद करावा : रांजणे

कामाचे श्रेय लाटण्याचा उद्योग पवारांनी बंद करावा : रांजणे

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून जावळी तालुक्‍यातील नऊ रस्त्यांची दर्जोन्नती झाली आहे. दर्जोन्नती झाल्याने प्रमुख जिल्हा मार्ग बनलेल्या या नऊ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून दोन कोटी 96 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. स्वत: काडीचे काम करायचे नाही. मात्र, शिवेंद्रसिंहराजे यांनी काम केले, की ते मीच केले, अशी दवंडी पिटायची आणि दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटायचे, हा जुनापुराना उद्योग दीपक पवारांनी आता बंद करावा, अशी टीका ज्ञानदेव रांजणे यांनी केली आहे. 

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू नये आणि रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती व्हावी, यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार जावळी तालुक्‍यातील नऊ रस्ते जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. या 9 रस्त्यांची दर्जोन्नती होऊन प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून गणल्या गेलेल्या या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 96 हजार रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीतून महू, पिंपळी, खर्शी, वालूथ, हुमगाव, इंदवली, दरे, करंदोशी या प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्तीसाठी 23.61 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. 

कास, एकीव, गाळदेव, माचुतर या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 21.45 लाख, याच रस्त्यावरील दुरुस्तीसाठी 20.65 लाख रुपये, गोगवे, वरसोळी, गाळदेव, वाघदरे, म्हाते, मोहाट, गांजे, तांबी, खरोशी, निझरे, कामथी, वेळे ते कण्हेर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 27.95 लाख रुपये, दिवदेव, मार्ली, भालेघर, आखाडे जोड रस्ता दुरुस्तीसाठी 12.50 लाख, महामार्ग ते आनेवाडी, सायगाव, मोरघर, वाघेश्‍वर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 17.35 लाख, मेढा (वेण्णा चौक), कुसुंबी, सह्याद्रीनगर, कोळघर, अंधारी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, बामणोली रस्ता दुरुस्तीसाठी 33.90 लाख, राज्य मार्ग ते आंबेघर फाटा, पुनवडी, केडांबे, बोंडारवाडी रस्ता दुरुस्तीसाठी 16.80 लाख, भिलार, उंबरी, धावली, आलेवाडी खिंड, रेंगडी मुरा, कुंभारगणी, मोरखिंड, जननीमाता मंदिर, मोरावळे ते राज्य मार्ग या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 26.75 लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com