esakal | व्हेंटिलेटरअभावी मृत्यूस जबाबदार कोण?; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ठरतेय मारक
sakal

बोलून बातमी शोधा

Ventilator

कऱ्हाड तालुक्‍यात आत्तापर्यंत 228 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, पाच हजार नागरिक बाधित आहेत.

व्हेंटिलेटरअभावी मृत्यूस जबाबदार कोण?; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ठरतेय मारक

sakal_logo
By
विलास माने

मल्हारपेठ (सातारा) : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत जानेवारी ते मे दरम्यान 109 कोरोनाबाधितांचा (Corona Patient) मत्यू झाला. बहुतांश बांधितांना व्हेंटिलेटरची (Ventilator) गरज होती. मात्र, तो नसल्याने त्यांना जीव गमवावा लागला असल्याचा आरोग्य विभागाचा (Health Department) निष्कर्ष आहे. त्यामुळे जीव गमावलेल्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा प्रश्न सामान्यांतून विचारला जात आहे. तालुक्‍यात एक व्हेंटिलेटर युनिट आले आहे, तर राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्याही प्रयत्नातून आठ बेड उपलब्ध होतील. मात्र, हीच काळजी यापूर्वीही घेतली असती तर झालेले मृत्यू रोखता आले असते. (228 Civilians Died Due To Coronavirus In Karad Taluka Satara Marathi News)

तालुक्‍यात आत्तापर्यंत 228 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, पाच हजार नागरिक बाधित आहेत. कोरोनाच्या लाटेत व्हेंटिलेटरअभावी मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसाठी मदतीसाठीही प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. दै."सकाळ'ने व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे वार्तांकन केले होते. त्यानंतर राजकीय नेते व प्रशासनाने गांभीर्याने घेत त्याच्या हालचाली केल्या. त्यापूर्वीच असा प्रयत्न झाला असता, तर अनेकांचे जीव वाचवता आले असते. व्हेंटिलेटरअभावी मृत्यू झालेल्यांची जबाबदारी प्रशासन, लोकप्रतिनिधी घेणार का, असा सवाल केला जातो आहे.

मृत्यू झालेल्या प्रशासन लोकप्रतिनिधी तातडीची मदत देण्याची मागणी जोर धरते आहे. कोरोनात व्हेंटिलेटर बेडसाठी कऱ्हाड, सातारा, पुण्यावर तालुक्‍याला अलंबून राहावे लागते. शहरातही सध्याची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत तालुक्‍यात जानेवारी महिन्यातच प्रत्येक कोविड हॉस्पिटलमध्ये दहा व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली असती तर व्हेंटिलेटरअभावी आत्तापर्यंत मृत झालेल्या 228 नागरिकांपैकी निम्म्या नागरिकांचे प्राण वाचले असते, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.

पाटणात डझनभर नेत्यांचे वेधले लक्ष

'पाटण तालुक्‍यात एकही व्हेंटिलेटर बेड नाही' या मथळ्याखाली दै."सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनासह पाटण तालुक्‍यात डझनभर राजकारणी नेत्यांचे त्याकडे लक्ष वेधले. "मनसे'चे नारकर यांनी मागणी केल्याने पवनऊर्जा कंपनीने पुढाकार घेऊन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिले. राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तालुक्‍यात कोविड रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनीही कोविड रुग्णालयास जनरेटर उपलब्ध करून दिला.

228 Civilians Died Due To Coronavirus In Karad Taluka Satara Marathi News

loading image