प्रवास होणार सुखकर! कऱ्हाडसाठी तीन कोटींचा निधी
कऱ्हाड (सातारा) : येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामाची खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी नुकतीच पाहणी केली. त्यांनी शहरातील विविध भागांत काम सुरू असलेल्या ठिकाणाला भेटी दिल्या. त्या रस्त्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेऊन काही सूचनाही केल्या. (3 Crore Sanctioned For Kolhapur Naka To Krishna Bridge Road At Karad Satara Marathi News)
खासदार पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
खासदार पाटील यांच्या प्रयत्नातून येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल (Kolhapur Naka To Krishna Bridge) रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कऱ्हाड ते विटा (Karad to Vita) असा शहरातून मार्ग जात आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा पूलपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे, अशा तक्रारी होत्या. रस्त्यात खड्डे होते. शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळित होत होती. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
त्यानुसार खासदार पाटील यांनी निधी मंजूर करून घेतला आहे. त्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. शुक्रवारी खासदार पाटील यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. त्या कामाचा त्यांनी आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. या वेळी जयंत पाटील, जयंत बेडेकर, सारंग पाटील, रणजितसिंह पाटील, पोपटराव साळुंखे, सद्दाम आंबेकरी, शिवाजीराव पवार, गंगाधर जाधव, प्रशांत शिंदे, अनिल धोत्रे व उपअभियंता निखिल पानसरे उपस्थित होते.
खवळलेल्या समुद्राशी विनोदची झुंज अपयशी
3 Crore Sanctioned For Kolhapur Naka To Krishna Bridge Road At Karad Satara Marathi News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.