Koyna Dam : कोयनेच्या साठ्यात साडेतीन टीएमसी वाढ

कोयना पाणलोट क्षेत्राला मॉन्सूनच्या पावसाने रात्री झोडपून काढले आहे. २४ तासांत कोयनानगर येथे २२० मिलिमीटर आणि नवजाला २९८ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली.
Koyna Dam
Koyna Damsakal
Updated on

पाटण, (जि.सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्राला मॉन्सूनच्या पावसाने रात्री झोडपून काढले आहे. २४ तासांत कोयनानगर येथे २२० मिलिमीटर आणि नवजाला २९८ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. सध्या जलाशयात प्रतिसेकंद ६४ हजार ५८ क्युसेक पाण्याची आवक होत असून, एका दिवसात साडेतीन टीएमसी पाणीसाठा कोयना धरणात वाढला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

पाटण तालुक्यात शनिवारी दिवसभर संततधार पावसाच्या सरी पडत होत्या. मात्र, रात्री उशिरा पश्चिम घाटात मुसळधार पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली. आज दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे ओढे-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे.

गेल्या २४ तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे २२० (१९१७) मिलिमीटर, नवजाला विक्रमी २९८ (२२१०) मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १५८ (१७०५) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी जलाशयात प्रतिसेकंद १३ हजार २४० क्युसेक पाण्याची आवक होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam water storage update today
Alarm Bells Ring as Koyna Water Storage Drops Sharply Amid Delayed Monsoon
Irrigation Release Stopped as Koyna Reservoir Reaches Critical Level
Koyna Dam low water level news
Marathi News Esakal
www.esakal.com