
सांगवी/सोमंथळी : ठाकुरकी (ता. फलटण) येथे युवकाचा खून करून मृतदेह पुरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी फलटण पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ३६ तासांत अटक केली. मंगेश ऊर्फ मोन्या सचिन मदने (वय २१) व सोमनाथ माणिक मदने (वय ३२, रा. बोडरेवस्ती, ठाकुरकी, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत.