Koyna Dam : कोयना धरणातून 50,000 वरुन 40 हजार क्युसेक विसर्ग; कृष्णा-कोयना नदीकाठाला मिळणार दिलासा!

Koyna Dam : धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो ४० हजारवर करण्यात आला आहे.
Koyna Dam
Koyna Damesakal
Updated on
Summary

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.

कऱ्हाड : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रविवारी आणि सोमवारी सकाळपासून थोडी विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कोयना धरणातील पाणी साठ्यात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे.

सध्या धरणात ४५ हजार ६११ क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन, तो ४० हजारवर करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह (Krishna-Koyna River) अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे. त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच २५ जुलै २०२४ रोजी धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर त्याच रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले.

Koyna Dam
Krishna River : महापुरात वाहून गेलेल्या बेपत्ता इकबाल बैरागदार यांचा अद्याप शोध नाहीच; दोघांचा मृतदेह सापडला, पण..

कोयना धरणातील पाण्याची आवक ८५ हजार क्युसेकवर होती. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढतच चालली होती. त्यामुळे २६ जुलैला सकाळी सात वाजता धरणातून पाणी सोडण्याच्या क्षमतेते वाढ करुन आणखी १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर चार दिवस ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यानंतर धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने ३० जुलैला ४० हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला. त्यानंतर तो विसर्ग तीन दिवस स्थिर होता.

त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने एक ऑगस्टला पुन्हा ५० हजार विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून पुराचा धोका निर्माण झाला होता. गेली तीन दिवस तो विसर्ग स्थिर होता. मात्र, रविवारी आणि आज सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो ४० हजारवर करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून सोडण्यात आलेला दोन हजार १०० क्युसेक असा ४१ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरु आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam water storage update today
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Satara
Satara and Sangli Face Water Crisis as Koyna Power Generation Set to Halt
Marathi News Esakal
www.esakal.com