esakal | Don't Worry! साताऱ्यात 4 हजार 900 डोस उपलब्ध; जिल्ह्यातील 'या' केंद्रांवर मिळणार लस
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccines

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यात लसीकरण मोहीमही गतीने सुरु आहे.

Don't Worry! साताऱ्यात 4 हजार 900 डोस उपलब्ध; जिल्ह्यातील 'या' केंद्रांवर मिळणार लस

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : कोरोना बाधितांची (corona patient) संख्या झपाट्याने वाढत असताना जिल्ह्यात लसीकरण (corona vaccination) मोहीमही गतीने सुरु आहे. आज रात्री जिल्ह्याला 14 हजार 900 कोविशिल्ड (Covishield) आणि दोन हजार कोव्हॅक्‍सिन (Covaxin) लशीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात लशीचे वाटप केले असून, लसीकरण मोहीम पुन्हा पुर्ववत सुरु झाल्याचे लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले. (4,900 Covishield And Covaxin Vaccines Available In Satara)

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्षापुढील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयासह आरोग्य केंद्रात मोठा प्रतिसाद मिळत होता. तसेच, दररोज 30 हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याला लशीचा अल्प प्रमाणात साठा उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहीम बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले होते.

मात्र, सध्यस्थितीत लशीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध होत असल्याने लसीकरण मोहीम पुर्ववत सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यत सुमारे सात लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, सर्वाधिक लसीकरण कोविशिल्ड लसीचे झाले आहे. जिल्ह्यात 16 हजार 900 लशीचे डोस उपलब्ध झाल्याने 72 प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व जिल्हा रुग्णालयात विभागून लशीचे वाटप केले जाणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून लशीचा साठा कमी उपलब्ध झाल्याने लसीकरणात खंड होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून लशीचा साठा वेळेवर उपलब्ध होत असल्याने लसीकरणाची मोहीम पुन्हा वेग घेत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: लसीकरणात महाबळेश्वरची आघाडी; जाणून घ्या तालुक्याची स्थिती

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, जावली, महाबळेश्वर, उंडाळे, खटाव, मायणी, पुसेगाव, पुसेसावळी, कालेढोण, वडूज, किनई, कोरेगाव, पळशी, रहिमतपूर, वाठार किरोली, सातारा रोड, पिंपोडे, पाचगणी, तापोळा, बामणोली, केळघर, कुडाळ, मेढा, सोमर्डी, कुसुंबी, सायगाव, खंडाळा, औंध, गोंदवले, ढेबेवाडी, पाटण, फलटण, वाई इत्यादी केंद्रांवर लस उपलब्ध झाली आहे.

4,900 Covishield And Covaxin Vaccines Available In Satara