esakal | कोयणा धरणात 50 टीएमसी पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रात फक्त 25 टक्के पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

कोयणा धरणात 50 टीएमसी पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रात फक्त 25 टक्के पाऊस

धरणातील पाणीसाठय़ाने अर्धशतक ओलांडले आहे. धरणात ५० टीएमसी पाणीसाठा झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात केवळ २५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

कोयणा धरणात 50 टीएमसी पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रात फक्त 25 टक्के पाऊस

sakal_logo
By
विजय लाड ः सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (सातारा) : कोयना धरण (koyna dam) पाणलोट क्षेत्रात ४८ दिवसापासून पाऊस (Rain) सुरु झाला आहे. ४८ दिवसात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात १,२०० मिमी पाऊस झाला असून धरणाच्या पाणीसाठय़ात केवळ २२ टीएमसी पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठय़ाने अर्धशतक ओलांडले आहे. धरणात ५० टीएमसी पाणीसाठा झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात केवळ २५ टक्के पर्जन्यमान झाले आहे.

हेही वाचा: पावसाळ्यातील पर्यटनाचे आगार कोयनानगर

मुसळधार पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी ५,००० मिमी पाऊस पडतो. यावर्षी १०५ टक्के पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस सुरु झाल्यापासून आजपर्यंत ४८ दिवस झाले आहेत. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे १२६३ मिमी नवजा येथे १७२६ मिमी तर महाबळेश्वर येथे १७६३ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. धरणात यापुर्वी २८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. १ जूनपासून धरणात ३१ टीएमसी पाणीसाठा आला आहे. धरणाच्या पाणीसाठय़ात २२ टीएमसी ने वाढ झाली आहे.

हेही वाचा: कोयनानगर : शिवसागरच्या बोटिंगसाठी "मानाईनगर स्पॉट' निश्‍चित

पाणलोट क्षेत्रात ७५ टक्के पाऊस शिल्लक असून २५ टक्के पर्जन्यमानातच कोयना ५० टीएमसी ने भरले आहे. धरणातून पश्चिमे कडील विज प्रकल्पासाठी ७.८० टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. धरणाची जल पातळी सध्या २१०७.३ फुट आहे तर धरणात ५०.०४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

loading image