
तारळे : शिक्षणाला वयाची अट नसते, गरज असते ती जिद्द, इच्छाशक्तीची आणि प्रयत्नांची. या त्रिसूत्रीच्या जोरावरच अंगणवाडी सेविकेने दहावीची परीक्षा दिली अन् त्या ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्णही झाल्या. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे याला महत्त्व आहे. इंदिरा विठ्ठल घाडगे असे त्यांचे नाव असून, त्या मुरुड - गोरेवाडी (ता. पाटण) येथील रहिवासी आहेत. तिथेच त्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत.