

-जालिंदर सत्रे
पाटण : ढगाळ वातावरणात अचानक मुसळधार पाऊस कोसळू लागला. दिवसभर काम करून थकलेले नागरिक गाढ झोपी गेलेले आणि पहाटे ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने संपूर्ण पाटण तालुका हादरला. कोयना विभागातील घरे रात्रीच्या अंधारात जमीनदोस्त झाली. तांबडे फुटले आणि लोकांच्या लक्षात आले सर्वांचं सर्वस्व हरवलंय. तालुक्यावर नैसर्गिक आपत्तीने घाला घातलेला तो दिवस म्हणजे ११ डिसेंबर १९६७. प्रलयकारी भूकंपाला आज ५७ वर्षे पूर्ण होत आहेत.