सातारा - येथील ध्यास फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला उत्सव रनला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रनमध्ये आठ वर्षांच्या मुलींपासून ७२ वर्षांच्या आजींपर्यंत सहभाग नोंदविला होता.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्यास फाउंडेशनतर्फे महिलांसाठी आयोजित रनमध्ये महिला दोन वयोगटांमध्ये धावल्या. तीन किलोमीटर फन रन आणि सात किलोमीटरच्या कॉम्पिटिशन रनमध्ये ३८५ महिलांनी सहभाग नोंदविला. डॉ. सुचित्रा काटे यांनी फ्लॅगऑफ केला.
कॉम्पिटिशन रन चार वयोगटांनी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिला वयोगट २४ पर्यंतमध्ये साक्षी जयदल हिने प्रथम, पार्वती मेसी हिने द्वितीय व अंजली काळभोर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
दुसरा वयोगट २५ ते ४० या वयोगटांमध्ये सुजाता शेळके यांनी प्रथम, सुश्मिता वाडेकर यांनी द्वितीय व कोमल गोळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सात किलोमीटर ४१ ते ५५ या वयोगटांमध्ये स्मिता शिंदे यांनी प्रथम, अल्मास मुलाणी यांनी द्वितीय व स्मिता बोरकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
५५ वर्षांवरील वयोगटांमध्ये डॉ. नीलिमा वनारसे यांनी प्रथम, सुनीता बोराटे यांनी द्वितीय व सुजाता पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवा. स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तराळकर, ध्यास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. वैजयंती ओतारी, स्फूर्तीच्या अध्यक्ष श्रुती दीक्षित, सचिव कविता देशमुख व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.