कऱ्हाड परिसराला मुबलक जैवविविधतेमुळे येथील नद्यांचा काठ समृद्ध आहे. त्या भागात पक्ष्यांची संख्या जास्त आहे.
कऱ्हाड : येथील निसर्ग समृद्ध कोयना व कृष्णा नदीच्या (Koyna and Krishna River) काठावर पक्षी वैभवाची भर पडली आहे. या काठावर पक्ष्यांच्या विविध ८२ प्रजाती (Bird Species) आढळल्या आहेत. कऱ्हाडला नुकतेच पक्षी निरीक्षण झाले. त्या वेळी अभ्यासकांनी त्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्षीही मोठ्या प्रमाणावर नोंदले गेले आहेत.