
कऱ्हाड : दिवाळखोरीत ८४ सहकारी संस्था
कऱ्हाड : दोन वर्षांत तालुक्यातील सहकार क्षेत्रातील विविध ८४ संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. उपनिबंधक कार्यालयाने त्या संस्था दिवाळखोरीत असल्याचे जाहीर केले. त्यात पतसंस्थांसह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. दोन वर्षांत सर्वाधिक ४० पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. मतदार याद्या न देणे, सरकारी कागदपत्रांची पूर्तता न करणे आदी क्षुल्लक कारणांनी अन्य संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. संबंधित संस्था अवसायनात असल्याने त्यांचे कामकाजही ठप्प आहे.
तालुक्यात १५० हून अधिक सहकारी संस्था आहेत. त्यातील मार्च २०२० पर्यंत ३० संस्था दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यात चार नागरी पतसंस्था, पाच बिगर नागरी पतसंस्था, तीन स्वयंरोजगार संस्था, चार गृहनिर्माण संस्था, एक पाणीपुरवठा संस्था, पाच औद्योगिक संस्था, तीन यंत्रमाग संस्था आणि अन्य पाच संस्थांचा सहभाग आहे. त्या अडचणीत येण्यामागे किरकोळ चुका आहेत. एप्रिल २०२१ अखेर २३ संस्था दिवाळखोरीत आहेत. त्यात दोन ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तर अन्य २१ नावीन्यपूर्ण संस्था आहेत. तालुक्यात भाजपच्या काळात ३८ नावीन्यपूर्ण संस्था निघाल्या. त्यातील २१ संस्था दिवाळखोरीत आहेत.
अन्य १७ संस्थांचे व्यवहार अद्यापही अपूर्ण आहेत. त्या संस्थांनी तयार केलेल्या प्रकल्पालाही मान्यता नाही. त्यामुळे काही संस्था अडचणीत आहेत. मात्र, शासनाने त्यांच्याबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्या संस्था अजूनही दिवाळखोरीत नाहीत. तालुक्यातील स्वावलंबनासह किरकोळ व्यवसाय सुरू करण्यासाठी, शेतीपूरक व्यवसायासाठी, शेतीमालाच्या गोदामासाठीही काही संस्था तयार झाल्या आहेत. त्या संस्था केवळ अर्थसाहाय्य मिळाले नसल्याने आर्थिक अडचणीत आहेत. त्या संस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. दिवाळखोरी जाहीर झालेल्या संस्था ५९ आहेत. त्यामध्ये अनेक संस्थांनी त्यांचे लेखापरीक्षण पूर्ण केले नाही. काही संस्थानी त्यांच्या मतदार याद्यांकडे दुर्लक्ष केले आहे. काहींनी सरकारी कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर काही संस्थांनी शासनाला हवी असलेली माहिती दिली नाही, अशा क्षुल्लक कारणांनी त्या दिवाळखोरीत गेल्या आहेत.
बंद संस्थांचा तपशील
सन २०२०
बिगरशेती व नागरी पतसंस्था ९
स्वयंरोजगार संस्था ५
गृहनिर्माण संस्था ४
पाणीपुरवठा संस्था १
औद्योगिक संस्था ५
यंत्रमाग संस्था ३
इतर संस्था ५
बिगरशेती व नागरी पतसंस्था २
नावीन्यपूर्ण संस्था २१
सन २०२१
बिगरशेती व नागरी पतसंस्था २९
Web Title: 84 Organizations In Co Operation Field Patsanstha Financial Crisis Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..