esakal | धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या शिवराजचा जीबीएस विषाणूमुळे मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Sable

जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या शिवराजचा जीबीएस विषाणूमुळे मृत्यू

sakal_logo
By
अशोक सस्ते

आसू (सातारा) : येथील शिवराज साबळे (Shivraj Sable) या तरुणाचा गुलियन बेरी सिंड्रोम (Guillain-Barre syndrome) (जीबीएस) व्हायरसमुळे (virus) मृत्यू झाला असून, यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. शिवराजने एक महिन्यापूर्वी कोरोनावर यशस्वी मात केली होती. जीबीएस व्हायरसमुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (A Young Man From Asu Village Died Due To Guillain-Barre syndrome Virus)

येथील शिवराज स्वामिनाथ साबळे (वय १९) या तरुणाला सुमारे एक महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्याचा एचआरसीटी स्कोअर केवळ दोन होता. या आजारातून तो पूर्णपणे बराही झाला होता. बरा झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारण्या होण्याऐवजी अशक्तपणा जाणवू लागला. परिणामी पाय थरथर कापू लागल्याने त्याला पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यास जीबीएस व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामिनाथ साबळे आणि माजी सरपंच हेमा साबळे यांचा हा मुलगा आहे. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच आसू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

A Young Man From Asu Village Died Due To Guillain-Barre syndrome Virus