एकीव धबधबा पाहण्यासाठी गेलेली युवती दगडावर पडून जखमी

एकीव धबधबा पाहण्यासाठी गेलेली युवती दगडावर पडून जखमी

Published on
Summary

मुलीचा धबधबा पाहात असताना पाय घसरला.

कास (सातारा): कास जवळील प्रसिद्ध एकीव गावातील पाबळ नावाच्या धबधब्यामध्ये मैत्रिणी बरोबर भिजण्यासाठी आलेल्या सातारा येथील श्वेता मुकुंद साठे (वय 18) रा. रामराव पवार नगर, गोडोली शाहूनगर येथील मुलीचा धबधबा पाहात असताना पाय घसरला. ती दगडावर कोसळून तिच्या डोक्याला गंभीर स्वरुपात मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

एकीव धबधबा पाहण्यासाठी गेलेली युवती दगडावर पडून जखमी
सातारा- देवळाई भागातील रस्ते चिखलमय; पाहा व्हिडिओ

सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मेढा पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी दुपारी सातारा वरून श्वेता मुकुंद साठे (वय 18) ही आपल्या चार ते पाच मैत्रिणींच्या समवेत जावळी तालुक्यातील एकीव पाबळ नावाच्या धबधब्यांमध्ये भिजण्यासाठी आल्या होत्या. धबधब्यामध्ये भिजत असतानाच श्वेता साठे तिचा पाय घसरला आणि ती थेट दगडावर कोसळली यातच तिच्या डोक्याला गंभीर स्वरुपात मार लागला व ती बेशुद्ध पडली.

एकीव धबधबा पाहण्यासाठी गेलेली युवती दगडावर पडून जखमी
सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वरसह 'या' पालिकांसाठी लवकरच 'रणधुमाळी'

घटनास्थळी असणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तिला उपचारासाठी सातारा येथील यशवंत हॉस्पिटल करंजे येथे दाखल केले. तिच्या अपघाताची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com